sanjayRaut, Dilip Walse Patil
sanjayRaut, Dilip Walse Patilsarkarnama

Satara NCP News : देवाला देवाच्या जागी ठेऊया... वळसे-पाटलांचा राऊतांना सल्ला

Dilip Walse Patil दिलीप वळसे-पाटील हे आज रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते.
Published on

Satara NCP News : संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते नेहमीच वेगवेगळी विधान करत सल्ले देत असतात. प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या अस्थेचा विषय आहे, त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेऊया... असा सल्ला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना दिला.

सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील Dilip Walse Patil हे आज रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते.शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राम मंदिर उद॒घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका केली होती. याबाबत वळसे-पाटील यांनी संजय राऊत यांना सूचक सल्ला दिला.

भाजपने आता फक्त राम लल्लालाच निवडणुकीत उभ करायचं राहीले आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. याबाबत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, आता काय उत्तर देऊ याच्यावर, असे वक्तव्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत मोठे नेते आहेत. ते नेहमी अशी वेगवेगळी विधाने करत सल्ले देत असतात. प्रभू रामचंद्र हे सर्वांच्याच आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेऊया, असा सल्ला वळसे-पाटील यांनी संजय राऊत यांना दिला.

Edited By : Umesh Bambare

sanjayRaut, Dilip Walse Patil
Satara News : गिरणी कामगारांच्या घरांसाठी शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार; साताऱ्यात मेळाव्याचे आयोजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com