विधानसभा निवडणूकीला जुन्नरच्या शिवसेनेला मानाचे पान देऊ, हे खासदार अमोल कोल्हे यांचे आश्वासन हवेत विरले असून, महाविकास आघाडीच्या विरोधात शड्डू ठाकलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी अखेर आपली तलवार म्यान केली आहे. उमेदवारी वाटपामध्ये अन्याय झाल्याचे सांगत खंडागळे यांनी शिवसैनिकांचा मोठा मेळावा घेत, उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मोठ्या घडामोडींनंतर सोमवारी (ता.४) कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, भावनांना आवर घातल मी माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी खंडागळे यांना अश्रू अनावर झाले होते.
जुन्नर विधानसभा उमेदवारी वाटपा मध्ये महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चुरस निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत, आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे काम करत, त्यांना विजयी केले होते. हाच धागा पकडत शिवसेनेने जुन्नर विधानसभा मतदारसंघावर प्रबळ दावा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील खा. कोल्हे यांनी शिवसेनेला (ShivSena) विधानसभा निवडणुकीत मानाचे पान देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेचा दावा अधिक प्रबळ झाला होता. यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्रदेश चिटणीस असलेले विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) उमेदवारी जाहीर केल्यावर, शिवसैनिक आक्रमक झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर माऊली खंडागळे यांनी सोमवारी (ता.४) पक्ष कार्यकर्त्याचा मेळावा घेत, मी शिवसेनेचा पक्ष शिस्तीचा कार्यकर्ता असून, भावनांना आवर घालत, माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील उद्विग्न होऊन भावना व्यक्त केल्या.
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) जिवाचे रान करून, रक्ताचे पाणी करून महाविकास आघाडीचे काम केले. आम्हाला विधानसभेला जागा मिळेल अशी आशा होती. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याबाबत अनेक शिवसैनिकांनी आपल्या तीव्र भावना बैठकीत व्यक्त केल्या, भावना व्यक्त करताना अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले होते. ही उद्विगता मतपेटीतून कोणाच्या पथ्यावर पडणार हे आता निकालानंतरच समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.