राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारावरून आमदार रोहित पवार व नीलेश लंके यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या समर्थकांकडून त्यांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा व पोस्ट सुरू आहेत.
lanke and pawar
lanke and pawarSarkarnama

पारनेर ( अहमदनगर ) : राज्यात महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सत्तेवर आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मंत्रीपदातील एक जागा मागील आठ महिन्यांपासून रिक्त आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीचे एक मंत्रीपद कमी आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या समर्थकांकडून त्यांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा व पोस्ट सुरू आहेत. Discussion on the names of MLAs Rohit Pawar and Nilesh Lanka over the expansion of the state cabinet

राज्य मंत्रीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगर जिल्ह्यातील पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील आमदार रोहित पवार तसेच पारनेर-नगरचे आमदार नीलेश लंके यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे नीलेश लंके यांचे राज्यभर समर्थक आहेत. पक्षातील सामान्य कुटुंबातील चेहरा म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.

lanke and pawar
आमदार रोहित पवार यांची मंत्रीमंडळात वर्णी?

लवकरच राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, शिर्डी व अकोले नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमही सुरू आहे. त्याचा विचार करता सामान्य व ग्रामीण भागातील तरूण चेहरा म्हणून पवार व लंके यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांचेही तरूणांमध्ये मोठे आकर्षण आहे.

lanke and pawar
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

आमदार लंके हे 2019 च्या निवडणुकीत जायंट किलर ठरले. त्यांनी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या शिवाय राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये लंके यांनी केलेले काम हे सर्वश्रुत आहे. त्याच बरोबर कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले. लंके यांच्या या कामाचे देशातच नव्हे तर जगातही कौतुक झाले. त्याचा परिणाम या कोविड सेंटरला जगभरातून मदत मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com