Satara Nagar Parishad : ‘हळू आवाजात बोल; तू कोण सांगणार?’ : सातारा नगरपालिकेचे ठेकेदार एकमेकांच्या अंगावर धावले...

Dispute between two contractors : सातारा नगरपालिकेत निवडणुकीपासून वादाचे प्रसंग सुरूच आहेत. सत्ताधारी दोन्ही राजे गटातील नगरसेवकांमध्ये पुन्हा वाद झाला असून, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली.
Satara Nagar Parishad
Satara Nagar ParishadSarkarnama
Published on
Updated on

Satara, 24 August : सातारा नगरपालिकेत निवडणुकीपासून सतत वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. मध्यंतरी सत्ताधारी दोन्ही राजे गटामधील नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. आज पुन्हा एकदा नगरपालिकेत वाद झाला असून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत तो पोचला. त्यामुळे सातारा नगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सातारा नगरपालिकेच्‍या इमारतीत सोमवारी (ता.२४ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्‍या सुमारास दोन ठेकेदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. वादावादीनंतर एकमेकाच्‍या अंगावर धावून जाण्‍याचे प्रकार घडल्‍याने पालिकेत तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिस नगरपालिकेत पोचण्यापूर्वीच दोघेही परांगदा झाले, त्यामुळे पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वीच वाद मिटला.

सातारा नगरपालिकेच्‍या इमारतीत सोमवारी सायंकाळी पाचच्‍या सुमारास एक ठेकेदार आला होता. पालिकेच्‍या अंतर्गत विविध प्रशासकीय कामांच्‍या बाबतीत तो मोठमोठ्याने बडबडत होता. त्‍याच्‍या आवाजाचा त्रास इतरांना होत होता. याचवेळी त्‍याठिकाणी दुसरा एक ठेकेदार आला. त्‍याने हळू आवाजात बोल, असभ्‍य शब्‍द वापरू नको, महिला आहेत, असे बडबडणाऱ्या ठेकेदारास सुनावले.

Satara Nagar Parishad
Manoj Jarange Patil : 'मराठा-कुणबी प्रमाणपत्रावरून सोलापुरात एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल'

यावरुन तू कोण सांगणार, असा प्रश्‍न बडबडणाऱ्या ठेकेदाराने सुनावणाऱ्या ठेकेदाराला विचारला. यावरुन वाद वाढत गेला. दोघांमध्ये शब्‍दाने शब्‍द वाढत जाऊन एकमेकांच्‍या अंगावर धावून जाण्‍यापर्यंत दोघांची मजल गेली. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मध्‍यस्‍थी करत त्‍यांना शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला, मात्र ते ऐकण्‍याच्‍या मनःस्‍थितीत नव्‍हते.

Satara Nagar Parishad
Solapur DCC Bank : बागलांच्या बल्क सोसायटी पॅटर्नपुढेही जगतापांचा सहकारातील गड अभेद्य!

त्यानंतर ते दोघेही नगरपालिकेच्‍या मागील बाजूस असणाऱ्या प्रवेशद्वारावर गेले. याठिकाणी पुन्‍हा वाद वाढून ते एकमेकांच्‍या अंगावर धावून जाऊ लागले. त्यानंतर जमलेल्‍यांनी वाद मिटवण्‍याचा प्रयत्‍न केला. याचदरम्‍यान काहीजणांनी याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिस येईपर्यंत ते दोघेही त्‍याठिकाणावरुन निघून गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com