Manoj Jarange Patil : 'मराठा-कुणबी प्रमाणपत्रावरून सोलापुरात एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल'

Maratha-Kunbi certificate Issue : सोलापूर जिल्ह्यात मराठा-कुणबी जातप्रमाणपत्रांच्या सात हजार फायली प्रलंबित असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. अधिकाऱ्यांमधील वादामुळे प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 24 August : सोलापूर जिल्ह्यातील मराठा कुणबी जातप्रमाणपत्रांच्या ७ हजार फायली पेडिंग पडल्या आहेत. फायली वर का पाठवला जात नाहीत; म्हणून एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तो अधिकारी म्हणतोय की, राहिलेले ७०० रुपये दिले नाहीत, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी तीन मंत्री आणि आमदारासमोर केला. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यापुढे जरांगे यांनी प्रश्नांचा पाढा वाचला. त्यात सोलापूरचा दोन अधिकाऱ्यांच्या भांडणाचा विषय मांडला.

ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्याची सूचना केली होती. मात्र, परवा आम्हाला बीडच्या अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की, कूळ, नात्यातील आणि रक्ताच्या नात्याचे यापैकी कूळ आणि नाते याला हात लावायचा नाही आणि त्याआधारे कुणबी-मराठा प्रमाणपत्र द्यायचं नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रमापणपत्र वाटपाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मराठा कुणबी जातप्रमाणपत्रांच्या सात हजार फाईल पेडिंग पडल्या आहेत. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने दुसऱ्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. फायली वर का पाठविल्या नाहीत म्हणून एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. (कार्यकर्त्याला उद्देशून आण रे तो एफआयआर) आमच्या मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी तुमचे अधिकारी एकमेकांवर गुन्हे दाखल करत आहेत. त्यावर मंत्री विखे पाटील हे सोलापूरला घडलंय का, असं विचारतात, त्यावर जरांगे पाटील यांनी हो म्हणत दुजोरा दिला.

Manoj Jarange Patil
Buldhana DCC Bank : जिल्हा बँकेत भाजप-शिवसेना-काँग्रेस-शरद पवारांच्या नेत्यांनी एकत्र येत उधळला गुलाल; राष्ट्रवादी आमदाराच्या पॅनेलला 2 जागा

जरांगे पाटील म्हणाले, कोणीतरी पादर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल की नोंदी आहेत तर कुणबी-मराठा प्रमाणपत्र देऊन टाकावीत. मंत्री शंभूराज देसाई हे कुठल्या जिल्ह्यात अशी विचारणा करतात, त्यावर जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील असे सांगतात.

कार्यकर्ता ते एफआयआर सोबत घेऊन गेल्याचे सांगतो, तेव्हा जरांगे पाटील ‘राहू दे, मी व्हॉटस ॲपवर पाठवतो,’ तुम्हाला असे मंत्र्यांना सांगतात. सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मी ते संपूर्ण प्रकरण वाचलं आहे, असे ते म्हणतात. त्यावर आपण सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. फायली आमच्या, आम्हाला काय प्रकरण आहे, ते माहितीही नव्हतं. ते अधिकारी म्हणतात, त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब. काही जण म्हणतात ठरलेली रक्कम का देत नाही. काही सांगतात की, राहिलेले १४ हजार का देत नाही. कोणी म्हणतंय ते ७०० रुपये. मग म्हणाले सेतूवाला लय शहाणा आहे, तो आपल्या ऐकण्याच्या बाहेरचा आहे. तो पैसे घेत नाही. त्या ठिकाणी आपल्या विचाराचे सेतूवाला आणू आणि त्याचा सेतू म्यूट करून टाकला जातो, असेही जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil
Solapur DCC Bank : बागलांच्या बल्क सोसायटी पॅटर्नपुढेही जगतापांचा सहकारातील गड अभेद्य!

त्यावर मंत्री उदय सामंत यांनी तसं असेल कारवाई केली जाईल, असे सांगितात. त्याबाबत नाराजी व्यक्त करत कारवाई गेली तीन वर्षांपासून ऐकतो आहे. पण काही होत नाही, अशीही नाराजी बोलून दाखवतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com