

Bank Election Update : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजमी सुरू असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात होऊ घातलेल्या पुणे जिल्हा सहकारी बँक, कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेसह राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील सुमारे एक हजारहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबणीवर पडणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामध्ये प्रारुप मतदार यादीवर हरकती देखील आल्या होत्या. त्यावर सुनावणीही पार पडली होती.गुरुवार (ता.29) पर्यंत यावर निकाल येण्यार होता. मात्र, निवडणूकच सरकारने पुढे ढकल्याने त्यालही ब्रेक लागला आहे.
गोकुळचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागल्याने सतेज पाटील यांच्या गटात मोठा उत्साह होता. जिल्हा बँक निवडणुकीत देखील पाटील गट जादू दाखवणार अशी चर्चा होती. तर, महायुतीने देखील गोकुळमध्ये झालेल्या चूका जिल्हा बँक निवडणुकीत टाळण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, आता या सर्वच राजकीय हालचाली थांबणार आहेत.
राज्यस सरकारने ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ निवारण व मदतकार्याला प्राधान्य देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहेत. विविध विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे. निवडणुकीच्या काळात या मदतकार्यावर परिणाम होण्याची शक्यता पाहून अखेर सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.