दिग्विजय बागलांकडून युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण

शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हे थकीत एफआरपी मागण्यासाठी गेले होते
Digvijay Bagal
Digvijay BagalSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : थकीत एफआरपी (FRP) मागण्यासाठी गेलेले युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे (shivsena) युवा नेते दिग्वीजय बागल यांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. ११ डिसेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली. दरम्यान, अध्यक्ष बागल यांनी रणदिवे यांचा मारहाणीचा आरोप फेटाळून लावला आहे. (District President of Yuva Swabhimani Shetkari Sanghatana Vijay Ranadive was beaten by Digvijay Bagal)

उसाची थकीत एफआरपीची मागणी करण्यासाठी युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे हे मकाई साखर कारखान्यावर गेले होते. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिग्वीजय बागल यांनी रणदिवे यांच्यावर हात उचलला. त्यावेळी उपस्थितांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आले. मी कोणालाही मारहाण केली नाही, असे सांगत माझ्या विरोधकांकडून माझे राजकीय करिअर उद्‌ध्वस्त करण्याच्या हेतूने या लोकांना कारखान्यावर पाठवले होते, असे कारखान्याचे अध्यक्ष बागल यांनी सांगितले. मात्र, परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत करमाळा पोलिस ठाण्यापर्यंत परिसरात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूने परस्परविरोधी फिर्यादी देण्याचे काम सुरू होते.

Digvijay Bagal
राजेश टोपे, दत्तात्रेय भरणे, रावल, चौधरी अन्‌ बारामती हॉस्टेलचे नाते!

केवळ माझी राजकीय मानहानी करण्याच्या हेतूने विरोधकांनी या लोकांना कारखान्यावर पाठवले होते. आम्ही खूप प्रयत्नाने मकाई सहकारी कारखाना सुरू केला आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे, हे काही लोकांना बघवत नसल्याने त्यांनी हे कारस्थान रचलेले आहे. आम्ही शेतकऱ्यांचे सर्व पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत, असे मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सांगितले.

Digvijay Bagal
राष्ट्रवादीने विद्यमान उपाध्यक्षांसह नऊ संचालकांना दिला डच्चू!

मकाई सहकारी साखर कारखान्याकडे सहा कोटी एफआरपी थकीत आहे. या मागणीसाठी आम्ही कारखान्यावर गेलो होतो, त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आम्हाला मारहाण केली. आम्हाला शिवीगाळ केली आणि कारखान्याच्या बाहेर हाकलून दिले, असे युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com