BJP corporator Shibir : माध्यमांशी बोलू नका अन् कमर्शिअल नगरसेवक बनू नका : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी शिबिरात भाजप नगरसेवकांना सल्ला

Rambhau Mhalgi Prabodhini camp : पश्चिम महाराष्ट्रातील चार महापालिकांमधील भाजपच्या १९५ नगरसेवकांना ठाण्यात दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. फडणवीस, बन्सल आणि गोरे यांनी मार्गदर्शन करत नगरसेवकांना कामकाजाचे धडे दिले.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 September : पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी महापालिकांमधील भारतीय जनता पक्षाच्या 195 नगरसेवकांना ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कामकाजाचे धडे देण्यात आले. दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश बन्सल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यात मंत्री गोरे यांनी नगरसेवकांना ‘कमर्शिअल नगरसेवक’ होऊ नका, असा सल्ला दिला.

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026’ अंतर्गत ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित या शिबिराचा सोमवारी समारोप झाला. या शिबिरात 195 नगरसेवकांना राजकीय कामकाजाचे धडे देण्यात आले. त्यात बोलताना पालकमंत्री गोरे यांनी नगरसेवकांना काही मोलाचे सल्ले दिले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. शहराच्या विकासासाठी यापूर्वी कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आणण्यात यश आल्याचा उल्लेख करत त्यांनी नगरसेवकांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहन करत ‘कमर्शिअल नगरसेवक’ होऊ नका, असा सल्ला गोरे यांनी दिला. तसेच, पक्षाच्या नगरसेवकांनी माध्यमांशी बोलू नका, अशी सूचनाही त्यांनी केली.

Jaykumar Gore
Satyajeet Tambe CCTV : थोरातांसमोर तांबेंनी विखेंचे कौतुक; श्रेयवादावरून विरोधकांना सुनावले

नम्रता अन्‌ सौजन्याने वागा : फडणवीस

उद्‌घाटनाच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून नगरसेवकांनी नागरिकांची कामे करताना नम्रता आणि सौजन्य ठेवावे. नागरिकांशी सौजन्याने, तर अधिकाऱ्यांशी सन्मानाने वागावे. जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत नगरसेवक म्हणून आपली भूमिका बजावावी.

जनहितार्थ कामातून नॅरेटिव्हला उत्तर द्या : बन्सल

राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश बन्सल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे कार्य, पक्षाचा विस्तार आणि विविध विषयांना सामोरे जाताना पक्षाची भूमिका, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि विरोधकांकडून भाजपविरोधात निर्माण केले जाणारे नॅरेटिव्ह हे मोठे आव्हान आहे. या नॅरेटिव्हला जनहितार्थ कामातून उत्तर देण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.

Jaykumar Gore
Shivsena Politics : नगरसेवकपद वाचवा मी 20 नगरसेवक फोडते; विशाखा राऊतांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव..., सरवणकरांचा खळबळजनक दावा

भाजपविरोधाचे नॅरेटिव्ह

भाजपविरोधात विविध मुद्द्यांवर जनतेमध्ये नॅरेटिव्ह निर्माण केले जात असताना पक्षाचा विस्तार आणि जनाधार मजबूत ठेवण्याचे आव्हान नगरसेवकांसमोर आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणावेळी सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com