Shivsena Politics : नगरसेवकपद वाचवा मी 20 नगरसेवक फोडते; विशाखा राऊतांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव..., सरवणकरांचा खळबळजनक दावा

Samadhan Sarvankar on Vishakha Raut : विशाखा राऊत यांनी निवडणुकीच्या वेळी कुणबी जात असल्याचा दावा करत जात प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र, पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र अवैध ठरवलं. समितीच्या निर्णयाविरोधात राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Vishakha Raut, Eknath Shinde, Samadhan Sarvankar
Vishakha Raut, Eknath Shinde, Samadhan SarvankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 08 Sep : ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद अखेर रद्द झालं आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याची अधिकृत घोषणा महापौर रितू तावडे यांनी मुंबई महापालिकेच्या सभागृहात केली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

विशाखा राऊत (Vishakha Raut) यांनी निवडणुकीच्या वेळी कुणबी जात असल्याचा दावा करत जात प्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र, पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र अवैध ठरवलं. समितीच्या निर्णयाविरोधात राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांच्या नगरसेवकपदावर कारवाईचा मार्ग मोकळा झाला.

याच पार्श्वभूमीवर समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांनी विशाखा राऊत यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. राऊत यांनी अपात्रतेच्या कारवाईतून वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोनवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असं सरवणकर यांनी म्हटलं आहे.

Vishakha Raut, Eknath Shinde, Samadhan Sarvankar
School ID Scam : उपसंचालकाने एका शिक्षकाकडून केली तब्बल 3 लाखांची वसुली; शिक्षण विभागातील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश

‘मला या कारवाईतून बाहेर काढा, मी २० नगरसेवक फोडून तुमच्या पक्षात आणते,’ असा प्रस्ताव विशाखा राऊत यांनी शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचा दावा सरवणकर यांनी केला आहे. दरम्यान, मीना कांबळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळीही राऊत यांनी शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचं सरवणकर म्हणाले.

Vishakha Raut, Eknath Shinde, Samadhan Sarvankar
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा इशारा देताच सरकार अ‍ॅक्शन मोडवर 'त्या' निर्णयाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त ठरला!

राऊत यांना सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टीपदाची इच्छा होती, मात्र शिंदे यांनी त्याला नकार दिला. यामुळेच विशाखा राऊत यांच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी असल्याने त्या सतत एकनाथ शिंदेंवर टीका करतात, असंही सरवणकर म्हणाले.

दरम्यान, विशाखा राऊत यांच्या राजकीय भूमिकेवरही सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केले. राऊत या मातोश्रीच्या जवळच्या आणि ‘किचन कॅबिनेट’मधील व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांना ओबीसी नसल्याची माहिती पक्षातील वरिष्ठांना होती, असंही सरवणकर म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com