अल्टिमेटमची भाषा करू नये, हे कायद्याने चालणारे राज्य...शंभूराज देसाई

मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai म्हणाले, संभाजीनगरच्या Sambhajinagar झालेल्या सभेनंतर पोलिस आयुक्तांनी police commissiner सविस्तर तपास केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असेल.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात कोणी अल्टिमेटम देण्याची भाषा करू नये. हे राज्य कायद्याने चालणारे असून कायद्याचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडणार असेल तर पोलिस निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, असा सूचक इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर संभाजीनगर येथील सभेनंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना विचारले असता त्यांनी अल्टीमेटम वगैरे असा कोणी देण्याची भाषा महाराष्ट्रामध्ये करू नये. हे राज्य कायद्याने चालणारे असून कायद्याचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Shambhuraj Desai
Video: राज ठाकरे प्रमुख आरोपी ?;पोलीस नोटीस बजावण्याची शक्यता

मंत्री देसाई म्हणाले, ''संभाजीनगरच्या झालेल्या सभेनंतर पोलिस आयुक्तांनी सविस्तर तपास केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असेल. त्यांनी त्यामुळे केलेली कारवाई ही नियमाला धरून व अटींचा भंग झाला म्हणूनच केलेले आहे. ज्यांचा ज्यांचा या सभेत सहभाग होता, ज्यांनी ज्यांनी त्या सभेमध्ये याठिकाणी भाग घेतलेला आहे, अशा काही लोकांना कदाचित नोटीस दिल्या गेल्याची शक्यता आहे.''

Shambhuraj Desai
तर राज ठाकरेंवरही पोलिस कारवाई करतील...नाना पटोले

मला त्याची सविस्तर माहिती प्राप्त नाही, परंतु ज्याने कोणी अटींचे उल्लंघन केला असेल त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. ''अल्टीमेटम वगैरे असा कोणी देण्याची भाषा महाराष्ट्रात करू नये, हे राज्य कायद्याने चालणारे असून कायद्याचे पालन आणि सगळ्यांनी केले पाहिजे. त्यामुळे विशेषता सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेण्याची या कृतीमुळे त्रास होणार असेल कायदा-सुव्यवस्था राज्यातली बिघडणार असेल तर पोलिस निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करतील.'' सध्या राज्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तर आमचे पोलिस प्रभावीपणे हाताळण्यासाठी सदैव तयार आहेत. आत्तासुद्धा कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीत आमच्या पोलिसात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com