तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का? : रासपचे रत्नाकर गुट्टे सीईओंवर संतापले!

रत्नाकर गुट्टे यांचे नाव सत्कारासाठी सर्वात शेवटी पुकारण्यात आले.
 Ratnakar Gutte
Ratnakar GutteSarkarnama
Published on
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : पंचायत राज समितीचे पथक आज करमाळ्याच्या दौऱ्यावर होते. करमाळ्यात आल्यानंतर समितीचे सदस्य असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांचे नाव सत्कारासाठी सर्वात शेवटी पुकारण्यात आले. तेव्हा सत्कारासाठी पुढे आलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना आमदार रत्नाकर गुट्टे यांनी संतापून ‘तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का?’ असा प्रश्न केला. त्यांच्या प्रश्नाने स्वागत समारंभाचा नूरच पालटून गेला. (Don't you understand the protocol? : Ratnakar Gutte angry at CEOs)

करमाळा पंचायत समिती येथे गुरुवारी (ता. १६) पंचायत राज समितीच्या (पीआरसी) सदस्यांनी आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीपूर्वी समितीमधील सदस्यांचा करमाळ्याची कुलस्वामिनी कमलादेवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुरूवातीला पंचायत राज समितीचे सदस्य आमदार कृष्णा गजबे, आमदार शेखर निकम, त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व इतर चार अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. सर्वात शेवटी आमदार रत्नाकर गुट्टे यांचे नाव सत्कारासाठी पुकारले गेले. तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे गुट्टे यांचा सत्कार करण्यासाठी पुढे आले, तेव्हा गुट्टे चांगलेच संतापले.

 Ratnakar Gutte
आशिष शेलार शिवसेनेला पुन्हा जेरीस आणणार; भाजपने दिली महत्वाची जबाबदारी

या वेळी झालेले सत्कार प्रोटोकॉलनुसार झाले नाहीत. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार सर्वात शेवटी करण्यात आला. त्यावर गुट्टे यांनी संताप व्यक्त करत सर्वांसमोरच ‘तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का?’ असा प्रश्न केला. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी एक शब्दही काढला नाही.

 Ratnakar Gutte
खडसेंना तिकिट दिलं नसतं तर भाजप विधान परिषद बिनविरोध करणार होती? दानवे म्हणाले...

करमाळ्यात पंचायत राज समितीचे सदस्य येणार म्हणून सकाळपासून तयारी करण्यात आली होती. मात्र, सदस्य साडेपाच वाजता आले. त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम सुरु झाला. स्वागत कार्यक्रमात प्रोटोकॉल चुकल्याचे लक्षात आल्याने स्वागताचे वातावरणच बदलून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com