डॉ. भारत पाटणकर संतापले, म्हणाले, राज्यकर्ते मंत्रिपदाच्या चढाओढीत...

Dr. Bharat Patankar पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भारत पाटणकर बोलत होते.
Dr. Bharat Patankar
Dr. Bharat Patankarsarkarnama
Published on
Updated on

-जालिंदर सत्रे

Patan News : राज्यातील राज्यकर्ते मंत्रिपद मिळणार की जाणार? या चढाओढीत व राजकारणाच्या साठमारीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नांची त्यांना आठवण राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान असणार नाही. राजकीय गलिच्छ परिस्थितीचा इतका भयानक इतिहास ५० वर्षांच्या चळवळीतील वाटचालीत असा अनुभव कधी आलेला नाही, असा खेद श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, १७ जुलैपासून करण्यात येणारे कोयना धरणग्रस्त आमरण उपोषण २७ जुलैपासून केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पाटण Patan येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भारत पाटणकर Bharat Patankar बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण इतक्या निंदनीय थराला कधीच गेले नव्हते. वाटेल ते करीन; पण सत्तेत जाईन, ही जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची स्पर्धा पाहिली.

त्याचा जनतेला वीट आलाय, अशी संतप्त प्रतिक्रिया चालू राजकारणावर देऊन डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘या लोकप्रतिनिधींना मतदान करणारी ९५ टक्के जनता गोरगरीब, शोषित आणि वंचित घटकातील आहे. त्यांच्या सोबत असे वागणे महाभयंकर आहे. विरोधी पक्ष सुद्धा याच माळेचे मणी झाले आहेत, हे जनतेचे दुर्भाग्य आहे.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रधान सचिव पुनर्वसन, उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी झालेल्या बैठकांच्या आजपर्यंत झालेल्या इतिवृत्तावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या सह्या झालेल्या नाहीत. आजपर्यंत बैठक झाल्यानंतर १५ दिवसांत सह्या होत होत्या.

Dr. Bharat Patankar
Mumbai Agra Highway Accident : बुलडाण्यानंतर धुळ्यात भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

मात्र, आज दोन-दोन महिने झाले तरी एकाही इतिवृत्तावर सह्या झालेल्या नाहीत. प्रशासनाला बाजूला सारून सत्ताधाऱ्यांचा अंतिम निर्णय घ्यायचा नाही, ही नवीन परंपरा घातक आहे.’ २७ जुलैपासून करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणात १३०० धरणग्रस्त सहभागी होणार आहेत. मानाईनगर येथील महेश शेलार यांच्या फार्म हाऊसवर हे उपोषण होणार आहे.

Dr. Bharat Patankar
Satara NCP News : शशिकांत शिंदेंनी अजितदादांना स्पष्टच सांगितले, राष्ट्रवादीचे कुटुंब पुन्हा एकत्र आणणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com