Satara NCP News : शशिकांत शिंदेंनी अजितदादांना स्पष्टच सांगितले, राष्ट्रवादीचे कुटुंब पुन्हा एकत्र आणणार

Ajit Pawar विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शशिकांत शिंदे यांनी भेट घेतली. दोघांत सुमारे अर्धा तास सध्याच्या राजकिय घडामोडींवर चर्चा झाली.
Ajit Pawar, Shashikant Shinde
Ajit Pawar, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Shashikant Shinde News : ज्यांना आपला विरोध आहे, अशा जातीयवादी पक्षासोबत मांडीला मांडी लावून बसायचे कितपत योग्य आहे. गेल्या चार वर्षात सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून मला व माझ्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला गेला. त्यांच्यासोबत आम्ही बसलो तर कार्यकर्ते हतबल होतील. त्यामुळे आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार असल्याची भूमिका आमदार शशिकांत शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजितदादांपुढे मांडली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक कुटुंब असून हे कुटुंब पुन्हा एकत्र यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

विधीमंडळाच्या कामकाज सल्लगार समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे मुख्यप्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांची भेट घेतली. दोघांत सुमारे अर्धा तास सध्याच्या राजकिय घडामोडींवर चर्चा झाली. यावेळी शशिकांत शिंदेंनी अजित दादांसमोर आपली भूमिका मांडली.

यावेळी अजितदादांनी आमदार शिंदेंना आपल्या गटात येण्याविषयी विचारले. त्यावेळी त्यांनी आपण आजपर्यंत ज्यांच्याविरोधात भूमिका घेतली त्यांच्यासोबत जाणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न केला. मी संघर्ष करणारा नेता आहे. यापुढेही संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. त्यावर अजित पवारांनी त्यांना याबाबत काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही ठरवा. आपण याविषयावर नंतर बोलू असे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात शशिकांत शिंदे म्हणाले, विधानभवनात दादांशी माझी अर्धातास चर्चा झाली. मी माझी भूमिका त्यांच्या पुढे मांडली. पवारसाहेबांसह दोघांविषयी आम्हाला प्रेम, आदर आहे. पण,तुम्ही पवार साहेबांना सोडायला नको होते. यावर दादा भावनिक झाले. आजपर्यंत आम्ही भाजप, शिवसेनेशी लढा दिला आहे. गेल्या चार वर्षाच्या वाटचालीत मला व माझ्या कार्यकर्त्यांना सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून खूप त्रास दिला आहे.

Ajit Pawar, Shashikant Shinde
MLA Shashikant Shinde यांच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश | Rushikant Shinde | NCP |Sarkarnama

कोरेगाव मतदारसंघात दादा दौऱ्यावर आले तर आता त्यांच्यासोबत महेश शिंदेही असणार आहे. मीही तुमच्यासोबत बसलो तर समोरचा कार्यकर्ता हातबल होणार आहे. माझी लढाई जातीयवादी पक्षांशी आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत सहभागी होऊ शकत नाही.

आगामी काळात राष्ट्रवादीचे हे कुटुंब पुन्हा एकत्र यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आमदार शिंदेंनी नमुद केले. याभेटीतील चर्चा मी शरद पवार यांना सांगितली. त्यावेळी तेही भावनिक झाले होते, असेही आमदार शिंदेंनी सांगितले.

Ajit Pawar, Shashikant Shinde
Sharad Pawar Nashik News : 'मी टायर्ड नाही, रिटायर्डही नाही'; पवारांचा अजितदादांना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com