Karad Politic's : ‘सत्तेवर बसणारा कुणीही धुतल्या तांदळाचा नसतो. तो चुका करतोच, आमच्याकडूनही तशा चुका झाल्या’

Krishna Sugar Factory election 2026 : डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर करत कारखाना राजकारणाचा अड्डा बनवू नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
Dr. Indrajit Mohite
Dr. Indrajit Mohite Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 26 May : कारखान्याच्या सत्तेवर बसणारा कुणीही धुतल्या तांदळाचा नसतो. तो चुका करतो. तशा प्रत्येकाकडूनच चुका होतात. आमच्याकडूनही काही चुका झाल्या. मात्र, त्या चुकांवरून कारखाना राजकारणाचा अड्डा बनवणे योग्य नाही, त्यामुळे संस्थापक आणि सहकार पॅनेलच्या नेतृत्वाचा आणि क्षमतेचा अभ्यास करूनच सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी सांगितले.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत संघर्ष मंच सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेला पाठिंबा जाहीर केला आहे, त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मोहिते बोलत होते.

ते म्हणाले, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कोण्या एका व्यक्तीचा नाही. तो सभासदांच्या मालकीचा आहे. कारखाना आणि सहकार टिकला तरच सभासदांचे हित अबाधित राहील, या भूमिकेतून सहकार पॅनेलला पाठिंबा दिला आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यावा, निवडणुकीत काय करावे, याबाबत अनेकांशी बोलणी केली. कारखानदारीतील राजकारणाचे वाढते हस्तक्षेप, सहकार चळवळीतील बदल यामुळे कारखाना चालवणे कठीण झाले आहे. रयतने ३६ वर्षे सभासदांच्या हितासाठी संघर्ष केला. त्यानंतर कारखाना चालवण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी सभासदांच्या फायद्याचे निर्णय घेतले, असेही डॉ मोहिते यांनी स्पष्ट केले.

Dr. Indrajit Mohite
Indrajeet Mohite : ‘कृष्णा’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीला धक्का : माजी अध्यक्ष इंद्रजित मोहितेंचा ‘भोसलेंना' पाठिंबा

भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलकडे आर्थिक शिस्त, नेतृत्वक्षमता आणि कारखाना टिकवण्याची दृष्टी दिसते, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा अर्थ आम्ही प्रत्यक्ष प्रचारात उतरणार आहोत, असा नाही. सभासदांचे हित जपले गेले नाही किंवा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर रयत संघर्ष मंच पुन्हा संघर्षाच्या भूमिकेत उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Dr. Indrajit Mohite
Satej Patil: सतेज पाटलांनी गोकुळचा निर्णय घेतला, आघाडीचं नाव ठरलं! एका रात्रीत पत्रही फिरवलं

संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारला...

यशवंतराव मोहिते यांनी शेतकरी समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग स्वीकारला होता. सहकार क्षेत्रात राजकीय पादुका बाहेर काढाव्यात, असा त्यांचा विचार होता. पण, कारखान्याच्या दारातच सध्या राजकीय संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरी सत्तेच्या राजकारणात भरडला जात आहे, त्यामुळे संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारत आम्ही तात्पुरते एक पाऊल मागे घेतले आहे, असे डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com