
Solapur, 30 June : विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, त्यात डॉक्टरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर’ सादर करण्यात आलेला नव्हता. मात्र, मुसळे मानेच्या वकिलांच्या मुद्दा उचलताच तो सीडीआर न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डॉ वळसंगकर यांनी आत्महत्या करण्याच्या काही मिनिटे अगोदर हॉस्पिटलमधील एका असिस्टंटला दोनवेळा फोन केला होता. त्यात काय बोलणे झाले, असा सवाल मुसळे मानेचे वकील प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवादात उपस्थित केला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar ) यांच्या आत्महत्येला ७४ दिवस झाले असून चौकशीअंती पोलिसांनी कोर्टात संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केला आहे. मात्र, तिला कोर्टातून जामीन मिळाला. दरम्यान, डॉ वळसंगकर यांनी २०२२ ते २०२४ या काळात हॉस्पिटलचा चार्ज सोडला होता. मात्र, त्यांनी डिसेंबर २०२४ पासून पुन्हा रुग्णालयात लक्ष घातले होते. ते ओपीडी पाहत होते.
दरम्यान, डॉक्टरांनी १५ एप्रिल २०२५ पासून रुग्णालयात नियमीत ओपीडी सुरू केली, त्याबाबत डॉक्टरांनी मला फोन करून सांगितले होते, असे रुग्णालयातील एका असिस्टंटने जबाबात म्हटले आहे. त्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलमध्ये (Valsangkar Hospital) मी नियमितपणे येऊ लागले. आत्महत्येच्या दिवशी १८ एप्रिल रोजी डॉक्टर ओपीडीत आले होते, त्यावेळी ते प्रचंड टेन्शनमध्ये दिसले. मनीषाने आत्महत्येची धमकी दिल्याने टेन्शनमध्ये असून काय करावे, मला सुचत नसल्याचे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले. तुम्ही शांत राहा, आपण काहीतरी मार्ग काढू, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर ते दुपारी बारा वाजता घरी गेले.
आत्महत्येच्या दिवशी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास मी घरी असताना डॉक्टर वळसंगकर यांना ओपीडीसंदर्भात फोन केला होता. त्यावेळी डॉक्टर अतिशय तणावात वाटले, मनीषाने दिलेल्या धमकीमुळे मी खूप दु:खी आहे, आजपर्यंत कमावलेली इज्जत धुळीस मिळवेन, अशी धमकी मनीषा मुसळे माने हिने दिली आहे, असे सांगून डॉक्टरांनी फोन कट केला होता.
काही वेळ गेल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा मला फोन केला, त्यावेळी त्यांना ‘काय झाले’ असे विचारल्यावर आता मी जास्त बोलू शकत नाही, असे सांगून डॉक्टरांनी पुन्हा फोन कट केला. थोड्या वेळानंतर पुन्हा डॉक्टरांचा फोन आला. त्या वेळी त्यांनी ‘मी आता बोलण्याच्या मनःस्थितीत नाही,’ असे सांगून काहीवेळ थांबून फोन कट केला. त्याच रात्री नऊच्या सुमारास मला डॉक्टरांच्या आत्महत्येची माहिती मिळाली, असे त्यांच्या एका असिस्टंटने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
दरम्यान, मनीषा मुसळे माने हिचे वकिल ॲड प्रशांत नवगिरे यांनी हाच मुद्दा उचलून धरत आत्महत्येच्या काही वेळेच्या आधी आलेल्या फोन कॉलमध्ये काय बोलणे झाले, असा सवाल उपस्थित केला. त्या आधारे त्यांनी डॉक्टरांच्या मोबाईलच्या ‘सीडीआर’ची मागणी केली. मुलगा डॉ. अश्विन यांना भेटून आणि फोनवरूनही डॉक्टरांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला कॉल केले होते?, त्यांना कोणा कोणाचे कॉल आले होते, त्यांच्यात काय बोलणे झाले होते? याबाबतचा ‘सीडीआर’ न्यायालयात दोषारोपपत्रात का सादर करण्यात आला नाही, असाही प्रश्न ॲड. नवगिरे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांनी डॉ. वळसंगकरांच्या एक महिन्याचा सीडीआर कोर्टात सादर केला आहे.
डॉक्टरांच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंंगची सुविधा नव्हती
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्याकडे महागडे मोबाईल होते. त्यात कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती, त्यामुळे डॉक्टर आत्महत्येच्या दिवशी किंवा तीन-चार दिवस अगोदर कोणाकोणाशी बोलले. त्यांनी कोणाचे फोन आले होते, त्याच्या काय संवाद झाला, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या आत्महत्येचे नेमके कारण पुढे येणार आहे, असे त्यांच्या निकटवर्तीय मित्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.