रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे सिद्धटेक ते कोर्टी रस्त्याचे लवकरच सुरू होणार काम

आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील सिद्धटेक ते कोर्टी या रस्ताचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला करता येणार आहे.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar : अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातील काही रस्त्यांसाठी निधीही मंजूर झाला होता. मात्र राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर मंजूर कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून स्थगिती दिली. आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील सिद्धटेक ते कोर्टी या रस्ताचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला करता येणार आहे.

जिल्ह्यातील पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा असणाऱ्या सिद्धटेक ( जि. अहमदनगर) ते कोर्टी ( जि. सोलापूर ) या अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्याच्या कामासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. हा रस्ता ३४ किलोमीटरचा असून त्यासाठी २५४ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंतिम मंजुरीच्या आदेशाची केवळ प्रतीक्षा आहे. हा रस्ता झाल्यास सिद्धटेक व राशीनच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

MLA Rohit Pawar
Rohit Pawar : "जनता सोबत असली की किल्ला अभेद्य राहतो, निष्ठा जिंकली!"

हा रस्ता पुणे हद्दी पर्यंत व सोलापूर हद्दीपर्यंत झाला होता. मात्र अहमदनगर जिल्ह्यात या रस्त्याचे काम झाले नव्हते. या रस्त्याची दुरवस्था झाली होती. रोहित पवार आमदार झाल्यावर त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे रस्त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून २४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १७९ कोटी व उर्वरित १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी राज्य अर्थसंकल्पात ७५ कोटीची तरतूद करून निधी उभारण्यात आला होता. निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात होती. मात्र सरकार बदलल्यामुळे रस्त्याच्या कामाची फाईल लालफितीत अडकली. आमदार पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंतिम मंजुरी मिळताच रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

MLA Rohit Pawar
Rohit Pawar : कंबोज यांनी 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला ; पवारांचा जोरदार पलटवार

हा होणार फायदा

हे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास सिद्धटेक व राशिनमधील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. मराठवाडा व विदर्भातील भाविकांना या धार्मिक ठिकाणी येणे सहज शक्य होणार आहे. शिवाय सिद्धटेक व राशिन परिसरातील नागरिकांना अहमदनगर-सोलापूर महामार्गापर्यंत लवकर पोचता येणार आहे. त्यामुळे परिसरातील दळणवळणाची विकास होईल.

२५० कोटीच्या कामांची प्रतीक्षा

आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये सिद्धटेक ते कोर्टी या रस्त्या व्यतिरिक्त २५० कोटींची विकासकामे मंजूर करून आणली, मात्र या कामांना राज्य सरकारकडून स्थगिती मिळाली आहे. यात मंदिरे विकास, शासकीय इमारती, शहरासह ग्रामीण भागातील रस्ते, पुण्यश्लोक अहल्यादेवी स्मारक तथा चौडी गाव विकास आराखडा, जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते आदी विकासकामांचा समावेश आहे.

MLA Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, पाणंद रस्त्याच्या कामावरून विरोधकांकडून धुरळा उडवण्याचे काम...

या रस्त्या संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. ते या बाबत सकारात्मक आहेत. या रस्त्याचा कार्यारंभ आदेश निघाला असून कार्यारंभ आदेश लवकरच ठेकदार संस्थेला मिळेल आणि काम लवकरच सुरू होईल. मात्र माझ्या मतदार संघातील या रस्त्या व्यतिरिक्त २५० कोटीची विकासकामे रखडली आहेत. ही कामेही लवकरच सुरू करण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे.

- आमदार रोहित पवार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com