या कारणामुळे आमदार गोरेंना मंत्रिपद मिळण्यात अडचण...

मंत्रिपद Ministerial post मिळाले नाही म्हणून पुन्हा नाराजांचा गट A group of disgruntled तयार होणार का, अशा नानाविध प्रश्नावर सध्या गावोगावच्या पारांवर चर्चा रंगू लागल्या आहेत.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama

मायणी : ॲट्रॉसिटीचा आरोप असलेले 'माण' चे आमदार जयकुमार गोरे यांना राज्यातील नव्या शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी दिली जाणार की डावलणार याबाबत खटाव व माण तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. मात्र, आमदार गोरे यांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डींग लावल्याचे दिसत आहे.

मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना - भाजपाचे युती सरकार अस्तित्वात आल्यास माणचे आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, युतीचे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. अनपेक्षितपणे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची 'महाविकास आघाडी' तयार होऊन मविआ सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे अनेकांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरले.

MLA Jaykumar Gore
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाचा दणका

त्यामुळे आमदार गोरे यांचाही अपेक्षाभंग झाला. मंत्रीपदाची माळ गळ्यात पडू शकली नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळल्याने भाजपाच्या गोटात आनंदाला उधाण आले. त्यातच दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आनंदून गेलेल्या गोरे समर्थकांना आकाश ठेंगणे झाले आहे.

MLA Jaykumar Gore
सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

२०१९ च्या निवडणुकी दरम्यान दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस पाळतील. अन् जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळेल, असे त्यांचे समर्थक ठणकावून सांगत आहेत. मात्र, गोरे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच झालेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत तर त्यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन सुद्धा नाकारलेला आहे.

MLA Jaykumar Gore
आमदार गोरेंचे स्टार चमकणार; माण तालुक्याला लाल दिवा मिळणार

त्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्य न्यायालयात सुरू आहे. पुढील सुनावणी १३ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, गोरे यांना मंत्रिपद दिले आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक झाली. तर भाजप व नवोदित शिंदे सरकारवर नामुष्की ओढवली जाण्याची शक्यता आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीत गोरे यांना मंत्रीपद कसे मिळेल ? अशी चर्चा खटाव व माण तालुक्यातील राजकीय व सामाजिक पटलावर रंगू लागली आहे.

MLA Jaykumar Gore
सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी... शेखर गोरे

गोरेंचे समर्थक व विरोधक यांच्यात मंत्री पदावरून शाब्दिक संघर्ष होत आहेत. सर्वांना तर मंत्री पदे मिळणे शक्य नाही. बंडखोर आमदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांचेसह किती भाजपा आमदारांना नव्याने मंत्रिपदे मिळणार, त्यातून सर्वांचे समाधान होणार का, मंत्रिपद मिळाले नाही म्हणून पुन्हा नाराजांचा गट तयार होणार का, अशा नानाविध प्रश्नावर सध्या गावोगावच्या पारांवर चर्चा रंगू लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com