Eknath Shinde and Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीसाठी...' ; एकनाथ शिंदेंचं कोरेगावमधील प्रचारसभेत मोठं विधान!

CM Eknath Shinde at Koregaon Assembly Constituency : '... तर त्याला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही.' असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Koregaon Rally : 'आम्ही सत्तेवर आलो तर महायुतीच्या सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असेल अथवा मुलींना उच्च शिक्षण मोफत योजना असेल आदी ११ लोककल्याणकारी योजनांची चौकशी करण्याची धमकी विरोधक देऊ लागलेले आहेत. त्यात त्यांना माझे खुले आव्हान आहे की, आम्ही संघर्षातून पुढे आलो आहोत. पळपुटे मुळीच नाही आहोत. जेलमध्ये जावे लागले तरी १०० वेळा जायलाही तयार आहोत. धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मात्र, आम्ही एकही योजना बंद करणार नाही हा माझा शब्द आहे.', असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज(मंगळवार) कोरेगाव येथील जाहीर सभेत केले.

कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे तथा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाजवळील भंडारी मैदानावर आयोजित जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) बोलत होते.

Eknath Shinde
Deepak Kesarkar : राज ठाकरे म्हणाले शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने दिले चोख प्रत्युत्तर

यावेळी, 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. ही योजना चुनावी जुमला आहे. बंद पडेल, पैसेच मिळणार नाहीत असा खोटा प्रचार सुरू करण्यात आला. परंतु, आमची देना बँक आहे, लेना बँक नव्हे.कोणी माई का लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही" अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'आता हेच लोक मतं मागायला येतील तेव्हा त्यांना माझी लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी तुम्ही न्यायालयात का गेलात?, आम्हा बहिणींचा अपमान का केलात? याबद्दल जाब विचारा. प्रसंगी त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवा. २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल लागला की डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात टाकले जातील. योजना सुरू करताना पूर्ण कालावधीचा आम्ही विचार केला आहे. आम्ही बहिणींना दीड हजार रुपयेच देणार नाही तर चांगली ताकद दिलीत तर दीडचे दोन हजार, दोनचे अडीच हजार, अडीचचे तीन हजार असे करत लाडक्या बहिणींना आम्ही देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारखं लखपती करण्याचे स्वप्न ठेवलं आहे. ही योजना सुपरहीट करणार आहोत.', असेही नमूद केले.

याचबरोबर 'लाडक्या बहिणीच्या(Ladki Bahi Yojana) सुरक्षेचा प्रश्न आता विरोधक विचारू लागले असून, त्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या लाडक्या बहिनींच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. बदलापूर घटनेत हेच विरोधक प्रथम आरोपींना भर चौकात फाशी द्या म्हणत होते. मात्र, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ या नरधमावर गोळ्या झाडल्या तर हेच विरोधक अन्याय झाला असा टाहो फोडू लागले. हे लोक दोगले (दुतोंडी) आहेत. आमच्या लेकीबाळींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कधीच सोडणार नाही. तेव्हा सर्वांनी महायुतीला पाठबळ द्यावे.', असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Eknath Shinde
Ladki Bahin Yojana Latest News : महायुती सरकारनं पुन्हा डाव टाकला, विरोधकांना 'दे धक्का'; 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठा निर्णय

'आता जनतेच्या दरबारात जाऊ या. एकदा महाविकास आघाडीने अडीच वर्षांत केलेले काम आणि दीड वर्षात महायुतीने केलेल्या कामाचा हिशोब मांडूया. होऊन जाऊ द्या "दूध दूध अन् पाणी का पाणी." महाविकास आघाडीने बंद पाडलेल्या जवळपास सर्व योजना आम्ही सुरू केल्या, नव्हे तर त्या पुढे नेल्या आहेत. अडीच वर्षात महाविकास आघाडीने इरिगेशनच्या केवळ चार सुप्रीमा मंजूर केल्या. मात्र, महायूतीने केवळ दोन वर्षात तब्बल १३४ सुप्रीमा मंजूर करून लाखो हेक्टरवर जमीन ओलिताखाली आणलेली असून, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.', असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com