Deepak Kesarkar : राज ठाकरे म्हणाले शिवसेना बाळासाहेबांची प्रॉपर्टी, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने दिले चोख प्रत्युत्तर

Deepak Kesarkar Raj Thackeray Eknath shinde Mns Shivsena :बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Raj Thackeray Eknath shinde
Raj Thackeray Eknath shinde sarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar News : राज ठाकरेंनी डोंबिवलीमधून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. आपल्या उमेदवारांसाठी घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण ही एकनाथ शिंदेंची प्राॅपर्टी नसल्याचे म्हटले. ती प्राॅपर्टी बाळासाहेब ठाकरेंचीच असल्याचे राज यांनी ठणकावले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून देखील राज यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेबांची प्राॅपर्टी ही त्यांच्या विचारांवर चालणाऱ्याच लोकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारावर चालले म्हणून लोक त्यांच्याबरोबर राहिले.

बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच राज ठाकरे हे मोठे नेते आहेत त्यांच्यावर माझ्या सारख्या छोट्या माणसाने बोलणे योग्य नाही, असे देखील केसरकर म्हणाले.

Raj Thackeray Eknath shinde
Worli Constituency Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने 500 रुपये देऊन प्रचारासाठी लोकं आणली; 'शिवसेनाUBT'च्या तक्रारीची गंभीर दखल

आदित्य ठाकरेंवर टीका

दीपक केसरकर म्हणाले, ज्या वेळी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी काँग्रेसच्या नेत्याने अपशब्द वापरले होते. त्यावेळी त्या मंत्र्याला बाळासाहेबांनी मुंबईत येऊ दिले नाही मात्र, काँग्रेस नेत्यासोबत युवराज गळाभेट घेतात पण जनता हे सहन करणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंचे नाव न घेता केसरकर यांनी केली.

एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जाहीर सभेत राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काही जण म्हणतात बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे. तोच धनुष्यबाण काही जणांनी गहाण टाकला होता. मात्र, तो आम्ही सोडवला.

राज ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे

राज ठाकरे यांनी सोमवारी (ता.4) ठाणे आणि डोंबिवलीमध्ये आपल्या उमेदवारांच्या सभा घेतल्या. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय व्यासपीठावर महिला भोजपुरी गाण्यावर नाचते, असे राज ठाकरे म्हणाले तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण ही प्राॅपर्टी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची नाही. ती बाळासाहेबांची आहे, असे ठणकावले.

Raj Thackeray Eknath shinde
Hemant Godse Politics: `नांदगाव कनेक्शन!` पराभवाचे खापर गोडसेंनी अखेर फोडले छगन भुजबळांवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com