K P Patil Vs Prakash Abitkar : 'टाक कमिशन, घे परमिशन'! के. पी. पाटलांची आबिटकरांवर बोचरी टीका

Radhanagari Vidhan Sabha Politics : आमदार आबिटकर यांनी मला बदनाम करण्याचे काम केले आहे. मात्र बिद्री निवडणुकीत सभासदांनी त्यांना त्यांचे स्थान दाखवून दिले आहे.
Prakash Abitkar, K P Patil
Prakash Abitkar, K P PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : आगामी विधानसभा निवडणुकीवरून राधानगरी मतदारसंघातील वातावरण तापले आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्यावरून सुरू झालेल्या वादाने आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातील राजकीय वादाची दरी आता रुंदावत आहे.

मेळावे घेत एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोपांचा खेळ राधानगरी विधानसभा मतदारसंघात सुरू झाला आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर कंत्राट दाराकडून टाक कमिशन घे परमिशन हेच धोरण ठेवल्याची टीका केली आहे.

स्वतःच्या स्वार्थासाठी गुवाहाटीला जाऊन आमदाराने किती माया मिळविली, हे जनतेला माहीत आहे. मतदारसंघातील कामाचा दर्जाशी देणेघेणे नसणाऱ्यांनी कंत्राटदाराकडून टाक कमिशन, घे परमिशन हेच धोरण ठेवले आहे, असे म्हणत माजी आमदार के. पी. पाटील KP Patil यांनी आमदार आबिटकरांवर निशाणा साधला.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत के. पी. पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. या टिकेला उत्तर देताना पाटील यांनी आमदार आबिटकरांना लक्ष्य केले. माझ्यावर टीका करणाऱ्या आमदाराने मागील दहा वर्षांत किती संपत्ती जमा केली, हे जनतेला माहिती आहे.

पालीच्या डोंगरासह शेकडो एकर जमिनी उभारल्या आहेत. कंत्राटदारांकडून कमिशन घेऊन कोट्यावधीची माया गोळा केली आहे. त्यांच्या या विकासाची माया दूरवर पसरली आहे. बिद्री कारखान्याच्या आडून माझी बदनामी सुरू असल्याचा आरोपही के. पी. पाटील यांनी केला.

Prakash Abitkar, K P Patil
Eknath Shinde : 'सुधीरभाऊ, तुम्ही वेळेवर ही वाघनखं आणली'; CM शिंदेंना विधानसभेपूर्वी म्हणायचं होतं का...?

आमदार आबिटकर Prakash Abitkar यांनी मला बदनाम करण्याचे काम केले आहे. मात्र बिद्री निवडणुकीत सभासदांनी त्यांना त्यांचे स्थान दाखवून दिले आहे. त्यांच्या आडून बिद्रीवर कारवाई करण्याचे कारस्थान सुरू आहे. पण मी तो नव्हेच, असे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पण लखोबा लोखंडेंचे खरे रूप जनतेसमोर उघड झाले आहे, अशा शब्दात पाटील यांनी आबिटकरांचा समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Abitkar, K P Patil
Manorama Khedkar : शेतकऱ्याला धमकावलं, आता PCMC ला गंडवलं! मनोरमा खेडकरांच्या कंपनीला लागणार सील?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com