Tuljapur drugs case: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; माजी नगराध्यक्षाच्या पतीला कोर्टाच्या आवारातून नाट्यमयरित्या ठोकल्या बेड्या

Ex-mayor's husband arrested News : ड्रग्ज प्रकरणातील गेल्या काही दिवसापासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातून नाट्यमयरित्या ताब्यात घेतले.
 MD Drugs Case
MD Drugs CaseSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तब्बल 10 हजार पानांचे दोषआरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून त्यापैकी 20 आरोपींना अटक करण्यात आली असून 17 आरोपी फरार आहेत. त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणातील 'आका"ला मोकाट सोडण्यात आले असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचा इशारा खासदार निंबाळकर यांनी देताच पोलिसानी कारवाई केली आहे.

या ड्रग्ज प्रकरणातील गेल्या काही दिवसापासून फरार असलेला आरोपी व माजी नगराध्यक्षाचे पती विनोद उर्फ पिटू गंगणे यास पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातून नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. गंगणे यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी अटक केली.

तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ड्रग्ज तस्करीची सर्वत्र मोठी चर्चा आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहेत. धाराशिव येथील कोर्टात शुक्रवारी उशिरापर्यंत माजी नगराध्यक्षाचे पती विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गंगनेला पोलिसांनी (Police) नाट्यमयरित्या अटक केली.

 MD Drugs Case
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विमान उशिरा उडालं, पण त्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले, नेमकं काय घडलं?

दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणात अनेक राजकीय कनेक्शन समोर आल्याने गुंता वाढला आहे. या प्रकरणात सत्ताधारी व विरोधकानी एकमेकांवर आरोप केले आहेत. 15 फेब्रुवारी 2025 ला तुळजापूर तालुक्यात 2.5 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक उलगडे होत आहेत.

 MD Drugs Case
Ajit Pawar Politics : 'माझा चेहरा घेऊन जा...', अजित पवारांनी दिले पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत

लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग्ज तस्करीमध्ये पुजारीच पेडलर असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 10 हजार पानांचे दोषआरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले आहे.

 MD Drugs Case
Uddhav-Raj Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरेंची युती होणार! एकनाथ शिंदे हात जोडत म्हणाले, 'जिंकणार...'

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतरआतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली असून 17 आरोपी फरार आहेत.

 MD Drugs Case
Raj Thackeray-Uddhav Thackeray : राज-उद्धव जवळ, पण 'मनसे' लांब; युतीसाठी 'ती' अट ठरतेय डोकेदुखी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com