Uday Samant, Shambhuraj desai Shivsena Politics : सामंतांच्या 'कानपिचक्या', देसाईंचं योग्य 'नियोजन' अन् सांगलीतही सदस्य नोंदणी सुसाट...

Ratnagiri/Satara And Sangli Shivsena Politics : राज्यात भाजपने सदस्यता नोंदणी अभियान जोरात सुरू करत जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवले होते. जे जवळपास पूर्ण केलं आहे. पण मात्र, शिंदे गटाला सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण करताना दमछाक होताना दिसत आहे.
Eknath Shinde, Uday Samant, Shambhuraj desai Shivsena Politics
Eknath Shinde, Uday Samant, Shambhuraj desai Shivsena Politics sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri/Satara And Sangli News : राज्यात आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर भाजपने सदस्यता नोंदणी अभियान जोरात सुरू केले होते. प्रत्येक जिल्ह्याला पाऊन ते एक लाखाचे टार्गेट देण्यात आले होते. राज्याच्या समोर 1.5 कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवण्यात आले होते. जे तीन महिन्यांच्या आधीच पूर्ण झाले आहे. जवळपास 1 कोटी 44 लाख सदस्य नोंदणी जानेवारी महिन्यात पूर्ण झाली होती. यामुळे भाजपमध्ये चैतन्याचे वारे वाहत असतानाच मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सदस्य नोंदणीत विविध जिल्ह्यात दमछाक होताना दिसत आहे. पण कोकणातील रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि साताऱ्यात सदस्य नोंदणी सूसाट सदस्य नोंदणीची वाटचाल 1 लाखांकडे सुरू आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पक्षाची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान भाजपने योग्य नियोजन करत 1 कोटींच्या बाहेर सदस्य नोंदणी करण्याची कामगिरी केली आहे. यामुळे भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेसाठी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तर प्रत्येक जिल्ह्याला 1 लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट दिलं होतं. त्यापद्धतीने आता सांगली, सातारा आणि कोकणातील रत्नागिरीत सदस्य नोंदणीला वेग आला आहे.

Eknath Shinde, Uday Samant, Shambhuraj desai Shivsena Politics
Uday Samant News : शिंदेच्या दरे गावातील मुक्कामाची तुलना थेट ठाकरेंच्या लंडनवारीशी; सामंत विरोधकांवर बरसले

साताऱ्याने उद्दिष्ट्य गाठले

साताऱ्यात शिवसेना म्हणावी अशी मोठी झालेली नाही. पण जी आहे ती कोरेगाव आणि पाठण मतदारसंघात आहे. इतर ठिकाणी ती विखूरलेली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी दिलेले 1 लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या योग्य नियोजनामुळे आत्तापर्यंत शहरी आणि ग्रामीणमध्ये ऑनलाईन - 10 हजार आणि ऑफलाईन- जवळजवळ 70 हजार सदस्य नोंदणी झाली आहे. यामुळे साताऱ्याची वाटचाल 1 लाख सदस्य नोंदणी होताना दिसत आहे. यामुळे आगामी स्थानिकला साताऱ्यात महायुतीत बिघाडी झाल्यास शिवसेना स्वबळावर किमान दोन मतदारसंघात आपला झेंडा फडकवू शकते.

सांगलीतही सदस्य नोंदणी 60 टक्के झाली

सांगली जिल्ह्यात जी शिवसेना होती ती मुळ शिवसेना होती. पण शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना पहिला पाठिंबा दिला तो येथील वाळव्याचे आनंदराव पवार यांनी. पवार हेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी शिवसेना पक्ष बांधणी करताना सदस्य नोंदणीत मोठी झेप घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी असे मिळून ऑनलाईन- जवळपास 20 हजार आणि ऑफलाईन जवळपास 40 हजार सदस्य नोंदणी झाली झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पवार यांनी दिली आहे. आगामी स्थानिकसाठी जिल्ह्यात शिवसेनेची तयारी झाली असून सध्यातरी महायुती म्हणून निवडणुकीची तयारी केली जातेय. पण पक्षाने आणि प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यास स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी असल्याचेही पवार यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी सदस्य नोंदणी मुसंडी

शिवसेना सदस्य नोंदणीमध्ये सर्वांत मागे असलेल्या रत्नागिरी तालुक्याने मंत्री उदय सामंत यांच्या कानपिचक्यांनंतर मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी 1 लाखांचे टार्गेट निश्चित करण्यात आले होते. ज्यात ग्रामीण भागात जवळपास 19 हजार आणि शहरी भागामध्ये 4 हजारांच्यावर सदस्य नोंदणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 23 हजारांच्यावर सदस्य नोंदणी झाल्याने समाधान व्यक्त केलं जातय. पण 1 लाखांचे टार्गेट अद्याप दूर असून ते पूर्ण करण्यासाठी सध्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. तर पुढच्या महिन्याभरात एक लाखांचा टप्पा पार करण्याचा चंग शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे.

Eknath Shinde, Uday Samant, Shambhuraj desai Shivsena Politics
Uday Samant : सामंत भाजपच्या मुळावरच घाव घालणार होते, तयारीही झाली होती... इरादे लक्षात येताच जिल्हाध्यक्षांनी केला भांडाफोड!

यावेळी शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी, शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम अजून एक महिना चालणार आहे. रत्नागिरी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सदस्य नोंदणीचे एक लाख उद्दिष्ट आम्ही नक्कीच पूर्ण करून असा विश्वास व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com