CM Shinde challenged MVA : '..त्यासाठी आमची समोरासमोर येवून चर्चा करण्याची तयारी आहे' ; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान!

Eknath Shinde on Shambhuraj Desai : 'पाटणचा गड शंभुराज देसाईच सर करुन चौकार मारतील' असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
CM Shinde challenged MVA : '..त्यासाठी आमची समोरासमोर येवून चर्चा करण्याची तयारी आहे' ; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान!
Sarkarnama
Published on
Updated on

Patan Assembly Constituency News : 'स्वतःचे दिवस सोन्याचे करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारे हे सरकार आहे. दोन वर्षांत जे काम केले त्याचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत. अडीच वर्षात महाविकास आघाडीने जे काम केले त्याचा हिशोब त्यांनी द्यावा. एकदा समोरासमोर येवून दुध का दुध पाणी का पाणी होवू द्या. त्यासाठी आमची समोरासमोर येवून चर्चा करण्याची तयारी आहे.' असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज(मंगळवार) महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले. पाटण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रचारार्थ आय़ोजित सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) म्हणाले, 'लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे शंभुराज देसाई आहेत. त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात दोन हजार ९२० कोटी रुपये आणले आहेत. आम्ही दोन वर्षांपुर्वी उठाव केला नसता, तर २९ कोटीसुध्दा मिळाले नसते. दोन वर्षापुर्वीचे सरकार ऐकणारे, बोलणारे, संवाद साधणारे नव्हते, ते बहिरे सरकार होते. घरात बसुन फेसबुक लाईव्ह करुन राज्य चालवता येत नाही. फक्त कोमट पाणी प्या म्हणून चालत नाही, पोटाला काय पाहिजे विचारायला लागते.'

CM Shinde challenged MVA : '..त्यासाठी आमची समोरासमोर येवून चर्चा करण्याची तयारी आहे' ; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान!
Eknath Shinde and Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीसाठी...' ; एकनाथ शिंदेंचं कोरेगावमधील प्रचारसभेत मोठं विधान!

'कोवीडमध्ये मी आणि शंभुराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी पायाला भिंगरी लावून काम केले. जेव्हा जेव्हा संकटे येतात, आपत्ती येते त्यावेळी शंभुराज देसाई पुढे असतात. त्यामुळेच तब्बल तीन वेळा जनेतेने त्यांना निवडून दिले आहे. आता त्यांना चौकार मारायची संधी मतदारांनी त्यांना द्यावी. पाटण विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत आहे मला असे सांगितले. मात्र येथे फक्त भगवाच रंग दिसत असल्याने ही निवडणूक एकतर्फीच आहे. कोणीही समोर आले तरीही त्याचा निभाव जनता लागू देणार नाही. मी उठाव केला त्यावेळी शंभुराज देसाई दोन पावले माझ्या पुढे होते. त्यामुळे मी त्यांना सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. जनतेचे आशीर्वाद त्यांच्या मागे असल्याने पाटणचा गड शंभुराज देसाईच सर करुन चौकार मारतील.' असंही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी बोलून दाखवलं.

CM Shinde challenged MVA : '..त्यासाठी आमची समोरासमोर येवून चर्चा करण्याची तयारी आहे' ; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान!
Babanrao Shinde : बबनदादांनी सुरू केली मुलाच्या विजयाची गोळाबेरीज; पंढरपुरात घेतली भाजपच्या माजी आमदारांची भेट

ते म्हणाले, 'वर्षाला १० लाख लाडक्या भावांनाही प्रशिक्षण भत्ता दिला जाईल. मुलींच्या उच्च शिक्षणाची फी सरकार भरत आहे. शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जेष्ठांसाठी वयोश्री योजना सुरु केली आहे. राज्यात उद्योग आले असून आणखी येत आहेत. लोकांच्या हाताला काम मिळत आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून एक लाख तरुणांना मदत केली आहे. स्वतःचे दिवस सोन्याचे करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारे हे सरकार आहे. दोन वर्षांत आम्ही जे काम केले त्याचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत. विरोधक खोटा प्रचार, अपप्रचार करुन मते मागत आहेत. त्यांच्यापासून सावध रहावे. मी शंभुराज देसाईंच्या विजयी सभेला येणार होतो. मतांचा पाऊस पाडून आत्तापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडून जास्तीत जास्त मतदान करुन विरोधकांना चारीमुंड्या चीत करुन विजय मिळवावा.' असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com