‘महिलांनी काय घालवं आणि कसं वागवं, हे भिडेंनी सांगू नये’ : प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

प्रत्येक महिलेला एक वस्तू म्हणून बघितलं जात आहे.
Praniti Shinde-Sambhaji Bhide
Praniti Shinde-Sambhaji BhideSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ‘तू अगोदर कंकू लाव, त्यानंतरच मी तुझ्याशी बोलेन’ असे विधान करणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. ‘महिलेने काय घालवं आणि कसं वागावं,’ हे त्यांनी आम्हाला सांगू नये, अशी टीका त्यांनी भिडे यांच्यावर केली आहे. (MLA Praniti Shinde criticizes Sambhaji Bhide)

मुंबईत मंत्रालयात आलेले संभाजी भिडे यांना ‘साम’च्या प्रतिनिधीने काही प्रश्न विचारले होते. त्यावर बोलताना भिडे यांनी ‘तू अगोदर कुंकू लाव, त्यानंतरच मी तुझ्याशी बोलेन’ असे म्हटले होते. त्यावरून राज्यात मोठा गदरोळ सुरू आहे. विशेषतः महिला वर्गातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यासंदर्भात बोलताना प्रणिती शिंदेंनी भिडे यांना सुनावले.

Praniti Shinde-Sambhaji Bhide
शेतकरी संघटना सत्तेला चिकटली अन्‌ सत्व हरवून बसली!

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, संभाजी भिडे आणि भाजप विचारांची लोकं ही महिलांना ऑब्जेक्टिफाय करत आहेत. प्रत्येक महिलेला एक वस्तू म्हणून बघितलं जात आहे. त्या महिलेने काय घालावं, तिने कसं वागावं, हे या लोकांनी आम्हाला हे सांगू नये. आम्हाला आमची संस्कृती आणि देशप्रेम हे हृदयात आहे. ते आम्हाला दाखविण्याची गरज नाही.

Praniti Shinde-Sambhaji Bhide
आमदार प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका; ११ कोटींची मालमत्ता जप्त करणार

महिलांना काय घालावं आणि कस वागावं हे सांगण्याचा भिडे यांना अजिबात अधिकार नाहीय. त्यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो. तुम्ही महिलांचे काम आणि कर्तृत्व बघत नाही. फक्त चेहऱ्यावर जाता आणि त्यांना ऑब्जेक्टिफाय करता आणि त्यांच्यावर अत्याचार करता, असे सांगून आमदार प्रणिती शिंदे यांनी भिडे यांचा निषेध व्यक्त केला.

Praniti Shinde-Sambhaji Bhide
वाळू तस्करांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; मोठ्या नेत्याच्या कार्यकर्त्याचा हात?

जोपर्यंत अशा विचारांच्या लोकांची मानसिकता बदलत नाही, त्यामुळेच भाजपच्या राजवटीत महिलांवर अत्याचार होत आहेत, असेही प्रणिती शिंदे या वेळी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com