सोलापूर : भारतीय जनता पक्ष (BJP) युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी सहकारी मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांचे चिरंजीव मनीष देशमुख (Manish Deshmukh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनीष देशमुख हे सध्या लोकमंगल परिवाराचे संचालक आहेत. (Election of Manish Deshmukh as State Vice President of BJP Yuva Morcha)
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी देशमुख यांच्या नावाची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, आपली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. आपण आपल्या संघटन कौशाल्याने राज्यभरात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे संघटन वाढवावे. युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जास्ती जास्त युवकांना भाजपमध्ये सामील करण्यासाठी आपण अथक परिश्रम घ्याल, अशी अपेक्षा आहे. आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
सुभाष देशमुख हे सध्या दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार आहेत. मागील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते राज्याचे सहकार मंत्री होते. वडिलांना बॅकस्टेज देण्याचे काम मनीष देशमुख यांनी आजपर्यंत केले आहे. भाजप युवा मोर्चाच्या निमित्ताने प्रथमच देशमुख हे राजकारणात फ्रंट फूटवर आले आहेत. निवडणूक काळात वडिलांची प्रचार यंत्रणा सांभाळण्याचे काम मनीष देशमुख यांनी आजपर्यंत चोखपणे पार पाडले आहे.
मनीष देशमुख यांना थेट राज्यस्तरावरील पद मिळाल्याने त्यांना संपूर्ण राज्यात काम संधी मिळणार आहे. येत्या काळात ते या पदाला कशा पद्धतीने न्याय देतात, हे पाहावे लागणार आहे. लोकमंगल परिवारातील साखर कारखाने, बॅंका, पतसंस्था, दूध डेअरी आदी संस्थांचे काम पाहण्याची जबाबदारी मनीष यांच्यावर असायाची. आता त्यांना थेट राज्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटविण्याची संधी चालून आलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.