सहनशक्ती संपली होती, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले... शंभूराज देसाई

अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना CM Udhav Thackeray भेटून आम्ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यांच्याकडून दूर्लक्षच झाले.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : अडीच वर्षात सर्वकाही सहनशिलतेच्या पलिकडे गेले. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गट नेते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वखाली निर्णय घेतला आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्वाचा ज्वलंत विचार आम्ही सोडलेला नाही. आम्ही त्यांचेच शिवसैनिक असून शिवसेना टिकली पाहिजे या विचाराने आम्ही ४१ आमदार एकत्र आलो आहेत, अशी भूमिका माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

माजी मंत्री देसाई यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षावर बोट ठेवले. ते म्हणाले, मागील पाच वर्षात मी आमदार म्हणून काम करत होतो. त्यावेळी युतीचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी आमचे गट नेते एकनाथ शिंदे मंत्री मंडळात होते. त्या पाच वर्षात जेवढा निधी माझ्या पाटण विधानसभा मतदारसंघात आला तेवढ सुध्दा निधी मागील अडीच वर्षात येऊ शकला नाही.

Shambhuraj Desai
आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर! एकनाथ शिंदेंची डरकाळी

माझ्याकडे वित्तमंत्री पदाची जबाबदारी होती, तरीही माझी ही अवस्था असेल तर बाकीच्या आमदारांची ही तीच व्यथा निधी मिळत नाही, कामे मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यांच्याकडून दूर्लक्षच झाले. शेवटी आम्हाला त्रास होतोय, यामुळे आपला पक्ष अडचणीत येतोय, आपले आमदार नाराज होत आहे, ही नाराजी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला.

Shambhuraj Desai
कोरेगावात महेश शिंदे समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

पण अडीच वर्षात काहीही होऊ शकले नाही. हे सर्व आमच्या सहनशिलतेच्या पलिकडे गेले. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केली, काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्वाचा ज्वलंत विचार आम्ही काल ही सोडलेला नाही, आजही सोडलेले नाही, उदयाही सोडणार नाही. आम्ही शिवसैनिकच आहोत.

Shambhuraj Desai
दीपक केसरकर म्हणाले, खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही...

आम्ही या विचाराने ४१ आमदार एकत्र असून शिवसेना टिकली पाहिजे हे आमचे धोरण आहे. आमच्या व्यथा पुढे आली पाहिजे. यातून शिवसेनेत राहून एकनाथ शिंदे यांना गट नेते कायम ठेवले आहे. पण, काही मंडळींनी त्यांना बदलण्याचा प्रयत्न केला. गट नेता बहुमताने निवडतात. ५५ पैकी ४१ आमदार सांगतात की गटनेते शिंदेसाहेब आहेत. तेच आमचे गटनेते आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आता हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com