Anil Sawant-Tanaji Sawant
Anil Sawant-Tanaji SawantSarkarnama

Mangalveda Politic's : माढ्याच्या सावंतांची मंगळवेढ्यात एन्ट्री : भालके गटाच्या झेडपी मतदारसंघात राजकीय पेरणी

साखर कारखानदारीत मंगळवेढ्यात पाय रोवलेल्या सावंत परिवाराने कारखानदारीला दूध व्यवसायाची जोड देत दूध व्यवसायात शिरकाव केला आहे.

मंगळवेढा (जि. सोलापूर) : साखर कारखानदारीच्या निमित्ताने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू अनिल सावंत यांनी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात आपले मजबूत बस्तान बसविले आहे. त्याच भागात अनिल सावंत यांनी नव्याने दूध व्यवसायात प्रवेश करून साखरेला दुधाची जोड देत नवीन राजकीय पेरणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यास आणखी अवकाश असूनही अनिल सावंत यांनी भोसे जिल्हा परिषद गटावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. (Entry of Savants of Madha in Mangalvedha)

मंगळवेढ्याची (Mangalveda) ओळख दुष्काळी तालुका आहे. मात्र, अलीकडच्या काळात एक सहकारी आणि तीन खासगी साखर कारखाने तालुक्यात उसाचे गाळप करत आहेत. असे असले तरी तालुक्याची दक्षिण भागातील दुष्काळी दाहकता अजूनही कायम आहे. पाणीप्रश्न राजकीय फितीत अडकला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य मंत्री तानाजी सावंत, प्रा. शिवाजीराव सावंत आणि अनिल सावंत या तिघा बंधूंनी या भागातील माळरानावर लवंगी येथे खासगी साखर कारखाना सुरू करून आपले व्यावसायिक बस्तान बसवले आहे, यामुळे या परिसरातील अनेक तरुणांना रोजगाराच्या व अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लावला. या कारखान्याच्या सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज भाळवणी येथील १३२ के.व्ही केंद्राला देऊन तालुक्यातील विजेचा तुटवडा कमी करण्यातही देखील त्यांनी योगदान दिले आहे.

Anil Sawant-Tanaji Sawant
Jaynt Patil On Sharad Pawar : शरद पवारांनी राजीनामा मागे घेताच जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले हे आवाहन...

राज्यातील सत्ता बदलाच्या नाट्यामध्ये शिंदे गट आणि भाजप (BJP) हे नवीन राजकीय समीकरण उदयाला आले आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे शिंदे गटाच्या प्रमुख शिलेदारांमधील एक असल्याने मंगळवेढा तालुक्यात शिंदे गटाचा प्रवेश होण्याचा मार्ग सुकर झाला. मंगळवेढा शहरात प्रतिक किल्लेदार या नवोदित तरुणावर, तर ग्रामीण भागात अशोक चौंडे यांच्यावर शिंदे गटाच्या विस्ताराची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, तरीही भोसे जिल्हा परिषद गटावर अनिल सावंत यांनी लक्ष केंद्रित केले आहे. भोसे जिल्हा परिषद गटाची प्रभाग रचना जुनी की नवी हा विषय अजून अनिश्चित आहे, अशा परिस्थितीत या गटामध्ये असणाऱ्या अनेक गावात त्यांनी कुस्ती, क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिरे व अन्य सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना मदत उपलब्ध करून दिली आहे, तर याच गटातील निंबोणी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात योगदान दिले आहे.

Anil Sawant-Tanaji Sawant
Sharad Pawar On Ajitdada : पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर : शरद पवार म्हणाले....

अनिल सावंत यांनी राजकीय मोळी मजबूत बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. साखर कारखानदारीत मंगळवेढ्यात पाय रोवलेल्या सावंत परिवाराने कारखानदारीला दूध व्यवसायाची जोड देत अनेक तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देत दूध व्यवसायातही शिरकाव केला आहे. त्यामुळे या गटावर भविष्यात आपली राजकीय पकड घट्ट करण्याच्या दृष्टीने सावंत यांची वाटचाल सुरू आहे.

Anil Sawant-Tanaji Sawant
Sharad pawar News : शरद पवार भर पत्रकार परिषदेत जयंत पाटील, प्रफुल्ल पटेलांना म्हणाले ‘आय एम सॉरी...’

भोसे गटात भालके यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे; परंतु यातील काही शिलेदार भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या गळाला लागले आहेत, त्यामुळे भविष्यातील राजकीय स्पर्धा शिंदे गट विरोध भाजप अशी होणार का, अशी चर्चाही या निमित्ताने या भागात सुरू झाली आहे. भाजपने हा जिल्हा परिषद गट शिंदे गटाला देऊ केला, तर अवताडे गटात प्रवेश केलेल्या शिलेदारांनी काय करायचं, हादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com