हजार कोटींच्या निम्मे जरी कर्ज निघाले तर, सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन...

माझ्या नावापोटी संस्थेच्या प्रतिमेविषयी लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, असे मदन भोसले यांनी स्पष्ट केले.
Madan bhosale, Makrand Patil
Madan bhosale, Makrand Patilsarkarnama
Published on
Updated on

सातारा : किसन वीर कारखान्यावर हजार कोटींचे कर्ज आहे, असे म्हणणे धादांत खोटे आहे. साडे आठशे आणि हजार कोटींचा मध्य काढा त्यापेक्षा एक रूपयाही जास्त निघाला तर हा मदन भोसले कारखान्याच्या कामाकाजातूनच नव्हे तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन, असा विश्वास माजी आमदार व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला आहे.

किसन वीर कारखाना यावेळेचे गाळप करणार असून आमची गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. गाळप परवाना मागण्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांची थकित देणी देणार आहे, असे सांगून मदन भोसले म्हणाले, सार्वजनिक जीवनात आपण भले, आपले काम भले या भुमिकेत मी असतो. समाजात कोणी काही बोलत असतील टीका करत असतील. तर त्याला रोज उत्तरे देणे योग्य नाही. पण त्यांच्या टीकेचा अतिरके व्हायला लागला.

Madan bhosale, Makrand Patil
सिडको, एमएसआरडीसीकडून भू्स्खलनग्रस्तांना घरे बांधुन मिळणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

तसेच माझ्या नावापोटी संस्थेच्या प्रतिमेविषयी लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यामुळे मी आज बोलत आहे. कारखान्यावर एक हजार कोटींचे कर्ज आहे, ही वस्तुस्थिती आहे का, या प्रश्नावर श्री. भोसले म्हणाले, संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. किसन वीर वर एक हजार कोटींचे कर्ज आहे, असे म्हणणे धादांत खोटे आहे. साडे आठशे आणि हजार कोटींचा मध्य काढा, त्याच्यापेक्षा एक रूपया जास्त निघाला तर मदन भोसले कारखान्याच्या कामाकाजातून नव्हे तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईल, एक दिवसही कार्यरत राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जरंडेश्वर कारखाना ज्या पध्दतीने हडपण्याचा प्रयत्न झाला, त्यापध्दतीने किसन वीरमध्येही चालले आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, छुपेपणने कोणाच्या काही इच्छा असतील तर मला काहीही माहिती नाही. त्यांचे वर्तन पाहिले तर शेतकऱ्यांच्या बद्दल प्रेम, अस्था दिसत नाही. केवळ कारखाना व मदन भोसलेंच्यापुढे अडचणी निर्माण करणे तसेच मदन भोसलेंना तेथेच गुंतून पाडावेत, हीच त्यांची भूमिका आहे. ती चुकीची आहे. त्याला उत्तर निवडणूकीच्या माध्यमातून मिळेल. लोकसभा, विधानसभेला काय भूमिका काय राहणार याविषयी ते म्हणाले, जे काम करतात त्यांना चांगले काम करू द्यात. आज कशाला त्याचा उल्लेख करायचा, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com