'मविआ' सरकारमध्ये मंत्री असुनही मला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता...

Shambhuraj Desai : इच्छा नसतानाही काही निर्णय घ्यावे लागले...
Udhav Thackeray, Shambhuraj Desai
Udhav Thackeray, Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) आम्ही असताना काही निर्णय हे इच्छा नसतानाही अनिश्चेने घ्यावे लागले. मी अर्थराज्यमंत्री असुनही मला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. आमचे सरकार आल्यावर राज्याच्या हितासाठी काही निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री यांनी बदलले, अशी खदखद शिंदे-फडणवीस सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केली आहे. (Uddhav Thackeray, Shambhuraj Desai Latest News)

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
ट्विन टॉवर पडले आता परबांचे रिसॉर्टही पडणार..

मंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये मी गृहराज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री होतो. त्यावेळी आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे काही निर्णय हे आम्ही मंत्री असतानाही अनिश्चेने घ्यावे लागले होते. त्यामध्ये राज्याचे हित नव्हते. आमचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही निर्णय राज्याच्या हितासाठी बदलले आहेत. त्यामुळे त्यातुन राज्याचा फायदाच होईल, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले.

चोरटी दारु रोखण्याचे आदेश

राज्याला उत्पादन मिळवुन देणारे तिसऱ्या क्रमांचे उत्पादन शुल्क विभाग आहे, असे सांगत ते म्हणाले की, माझ्याकडील विभागाने १८ हजार कोटी रुपयांचा निधी सरकारी तिजोरीत जमा केला आहे. कर चुकवेगीरी, बॉर्डरच्या जिल्ह्यातुन होणारी चोरटी दारु वाहतुक रोखण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यातुन माझ्याकडील विभागाचे उत्पन्न वाढवण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Udhav Thackeray, Shambhuraj Desai
पुस्तकाचं गाव 'भिलार'च्या दर्जाबाबच मुख्यमंत्री शिंदेंनी दिला महत्वाचा आदेश

दरम्यान, एकनाथ एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ४० आमदारांनी बंड केल्यावर बंडखोर आमदार आणि शिवसेनेमध्ये मोठे शाब्दिक युद्ध बघायला मिळत आहे. याबरोबरच बंडखोरांकडून अनेक खुलासे करण्यात येत आहेत. यांच्यातील वाद हा नुकत्याचा पार पडलेल्या पावसाळी आधिवेशना दरम्यानही संपूर्ण राज्याला बघायला मिळाला होता. महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या '५० खोके एकदम ओक्के' ही घोषणा तर चांगलीच जिव्हारी लागली होती. यानंतर बंडखोर आमदार आणि भाजपच्या आमदारांनीही आंदोलन करत आघीडीवर आणि शिवसेनेवर टीका केली होताी. आता हा नवीनच आरोप देसाईंनी केल्याने यावर सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com