
Solapur News, 10 Dec : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे सध्या गाव ईव्हीएम विरोधात लढा देणाऱ्याचं केंद्रबिंदू ठरलं आहे.
कारण या गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकार यांच्या समर्थकांनी ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरवर मॉक पोलिंग मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने अशा पद्धतीने मतदान घेण्यास मज्जाव केला. या गोष्टीची दखल राज्यासह देशभरातील नेत्यांनी घेतली.
त्यामुळे मारकरवाडी हे गाव चांगलंच चर्चेत आलं. शरद पवारांनी (Sharad Pawar) नुकतीच या गावाला भेट देत ईव्हीएमवर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तर या गावात शरद पवार येऊन गेल्यानंतर भाजप आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप नेते राम सातपुते यांनी आज मारकरवाडीला भेट दिली.
यावेळी ग्रामस्थांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढत दोघांचं जल्लोषात स्वागत केलं. यानंतर या सर्व नेत्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जाहीर सभेत बोलताना त्यांनी ईव्हीएम विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावत शरद पवारांसह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी या सभेतून शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. सभेत बोलताना खोत यांनी राजेश खन्ना बॅलेट पेपरवर मतदान करताना त्यांच्या पाठीमागे राजीव गांधी आणि सोनिया गांधी उभे असतानाचा फोटो दाखवत म्हणाले, अशा पद्धतीने ईव्हीएमवर मतदान करताना उभं राहता येत नाही.
शिवाय बॅलेट पेपरवर मतदान करताना थोडी गडबड वाटली तर एखादा पेपर फाडता येतो तोंडात कागद घालता येतो, खिशात घालता येतो, मात्र ईव्हीएम तोंडात घालता येत नाही. म्हणून यांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आहे. साठ-सत्तर वर्ष सत्ता भोगली त्यामुळे आता शरद पवारांनी शांत बसावं. पण यांना सत्ता गेल्यामुळे झोप लागत नाही. त्यांना सतत मागेपुढे पोलिसांचा ताफा पाहिजे, यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही.
शरद पवारांनी टाकला तर पहेलवानाने नवा डाव टाकला असं म्हणतात. मात्र गेली 40 वर्षे यांनी डाव पहिले पण देवाभाऊ नावाचा वस्ताद मैदानात आला आहे. तेव्हा कळलं की हा पहेलवान नव्हता तर दुधी भोपळा होता, अशी टीका त्यांनी पवारांवर केला. तसंच यावेळी त्यांनी देशात ईव्हीएम काँग्रेस आणल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, "देशात ईव्हीएम काँग्रेस आणलं. ईव्हीएमवर मतदान झाल्यानंतर यांनी 2004 ला केंद्रात दहा वर्ष सत्ता भोगली आणि राज्यातही सत्ता भोगली आणि आता म्हणतायत EVM काहीतरी गडबड करतंय.लोकसभेला तुमची पोरगी 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.