Lok Sabha Election 2024 : रवी राणा, चंद्रकांत पाटील यांच्यात नेमकी कोणती ‘गुफ्तगू’‌?

Amravati Politics : भाजपच्या बैठकीआधी अमरावतीच्या विश्रामगृहावर प्रदीर्घ चर्चा. महायुतीमधील प्रत्येकाचा नवनीत राणा यांच्या नावाला टोकाचा विरोध
Ravi Rana & Chandrakant Patil.
Ravi Rana & Chandrakant Patil.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशात निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांची अमरावती शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. बैठक सुरू होण्याआधीच आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटल यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा भाजपाचा घटक पक्ष आहे. खासदार नवनीत राणा यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यापासून त्या भाजपसोबत आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने युवा स्वाभिमानाला पाठिंबा द्यावा यासाठी त्या आग्रही असताना अमरावती लोकसभेचा उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवेल असा आग्रह भाजपच्या नेत्यांकडून होत असल्यामुळे नवनीत राणा यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

अशातच युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार व खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आपली कोणतीही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. जिल्ह्याच्या विकास कामांसंदर्भात आम्ही चर्चा केली असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अमरावती जिल्ह्यात रवी राणा यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना सोबत पंगा घेतल्याने भाजपाचे स्थानिक नेते राणांवर चांगलेच नाराज आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravi Rana & Chandrakant Patil.
Devendra Fadanvis : नवनीत राणा आमच्या कार्यक्रमात आल्या, तर त्यात नवल काय?

भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे, स्थानिक नेते शिवराय कुलकर्णी, तुषार भारतीय यांच्यासह कार्यकर्त्यांसोबतचा रवी राणा यांचा वाद अनेकदा दिसून आला आहे. अनेकदा भाजपने आयोजित केलेल्या भूमिपूजन कार्यक्रमात फलकांची तोडफोड करण्यात आली आहे. राणा यांनी नेत्यांवर आरोपही केले आहेत. त्यामुळे अमरावतीत राणा यांचा वाद झाला नाही असा एकही नेता शिल्लक राहिलेला नाही. या वादामुळे भाजपच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांची मने दुखावली गेली आहेत. त्यामुळे रवि राणा व नवनीत राणा यांच्या विरोधात 360 डिग्री नाराजी आहे. त्यामुळे राणा यांनी निवडणुकीत कितीही साम, दाम, दंड, भेद अशी नीती वापरली तरी त्यापेक्षा दुप्पट शक्ती खर्च राणांना पराभूत करण्यासाठी विरोधक लावणार आहेत.

सर्वच नेते राणा यांच्यापासून दुखावल्याने त्यांना उघड विरोध करीत आहेत. असे असले तरी भाजपचे सर्व नेते नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असा ठाम विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. आमचा प्रचार संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. आम्हाला लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीसाठी 135 गावात प्रचार सुरू आहे. आता पर्यंत 3 लाख 50 हजार लोकांना नवनीत राणा भेटल्याची माहिती रवी राणा यांनी दिली. असे असले तरी स्थानिक भाजप नेते आता रवी राणा आणि नवनीत राणा यांना किती जवळ करतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ravi Rana & Chandrakant Patil.
Amravati LokSabha constituency : चंदेरी दुनियेतून राजकारणात आलेल्या नवनीत राणा यांचे ग्रह यंदाही चमकणार?

अशात अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी (ता. 9) शहरात आलेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये स्थानिक भाजपा नेते व कार्यकर्त्यांची त्यांनी मते जाणून घेतली. त्यानुसार आता ते पक्षाच्या वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार आहेत. मात्र बैठकीपूर्वीच पाटील यांची राणा यांनी भेट घेतल्याने राणा आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये नेमकी काय ‘गुफ्तगू’ झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Ravi Rana & Chandrakant Patil.
Amravati News : खासदार नवनीत राणा यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com