भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या माजी मंत्र्याने सत्ताधाऱ्यांचा बापच काढला; म्हणाले, "शेतकरी बापाची तरी लाज राखा!"

NCP SP Laxmanrao Dhoble : राज्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार माजवला आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
NCP SP Laxmanrao Dhoble
NCP SP Laxmanrao Dhoblesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. माजी भाजप नेते व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सत्ताधाऱ्यांवर तिखट टीका केली.

  2. त्यांनी "बाप जर शेतकरी असेल तर त्या शेतकरी बापाची लाज राखा" असे वक्तव्य करत तातडीने मदतीची मागणी केली.

  3. शेतकऱ्यांच्या नावावर थेट निधी जमा करण्याची मागणी त्यांनी जोरदारपणे केली.

Solapur News : राज्यातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विविध जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुरामुळे जीवितहानी झाली असून घरांचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे मदतीसाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य सरकारकडे आस लावून बसले आहेत. मात्र अद्याप राज्यातील महायुती सरकारकडून कोणतीच ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाना साधत तिखट टीका केली आहे. त्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवरुन थेट सत्ताधाऱ्यांचा बापच काढला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज्यातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विविध जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पुराच्या पाण्यात पीकासह शेतातील मातीसुद्धा वाहून गेली आहे. हाततोंडाशी आलेला घास अतिवृष्टीनं हिरावून नेल्याने शेतकरी हातबल झाला आहेत. यामुळे एकीकडे शेतकरी चिंतेत आला असून दुसरीकडे पुराच्या पाण्याचा तडाखा अनेक गावांना बसला आहे. घरादारात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेलं आहे. घरांचे नुकसान झाले असून दुभती जनावरेही दगावली आहे. शेतीच काय तर अनेक ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे.

अशातच राज्य सरकारने ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना तत्काळ 10 किलो राशन देण्यासह तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण शेतीसाठी अद्याप ठोस मदत जाहीर झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांसह विरोधकांकडून महायुती सरकारविरोधात संताप व्यक्त केला जातोय. अशातच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाना साधत हल्लाबोल केला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांचा बापच काढला आहे.

NCP SP Laxmanrao Dhoble
NCP SP MLA : शिवसेनेच्या बैठकीला शरद पवारांच्या दोन आमदारांची हजेरी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ढोबळे यांनी, सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी असेल तर त्या शेतकरी बापाची लाज राखून तरी तातडीने मदत द्या. त्या गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसे जमा करा, अशी टीका केली आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेती पिके घरदारे जनावरे सगळे वाहून गेलं आहे. राज्यातला शेतकरी उध्वस्त झाला असून अशा परिस्थितीत सरकारने तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. त्यामुळे गरीब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करा अशी मागणी ढोबळे यांनी केली आहे.

कोण आहेत लक्ष्मणराव ढोबळे?

प्राध्यापक लक्ष्मण कोंडीबा ढोबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. 2009 ते 2011 या कालावधीत ते राष्ट्रवादीत असताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र विधानसभेच्या आधी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. तर आपण अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादी सोडली होती. भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण अजित पवार भाजपसोबत आले आणि पुन्हा त्रास देऊ लागलेत. अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून आता पुन्हा आपण भाजप सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

NCP SP Laxmanrao Dhoble
NCP SP MLA News : पवारांच्या आमदाराची मागणी एकनाथ शिंदेंनी तातडीने मान्य केली; मतदारसंघात मंत्र्यालाही पाठविण्याचा निर्णय

FAQs :

प्र.१: लक्ष्मणराव ढोबळे पूर्वी कोणत्या पक्षात होते?
उ: ते पूर्वी भाजपमध्ये होते.

प्र.२: सध्या ते कोणत्या पक्षात आहेत?
उ: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात.

प्र.३: त्यांनी कोणत्या मुद्यावर टीका केली?
उ: अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व मदत न मिळाल्याबद्दल.

प्र.४: त्यांची मुख्य मागणी काय आहे?
उ: शेतकऱ्यांच्या नावावर थेट निधी जमा करून तातडीने मदत द्यावी.

प्र.५: त्यांच्या वक्तव्यामुळे काय परिणाम झाला?
उ: राजकीय वर्तुळात चर्चा व तणाव निर्माण झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com