NCP SP MLA : शिवसेनेच्या बैठकीला शरद पवारांच्या दोन आमदारांची हजेरी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Yogesh Kadam Solapur Tour : शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सोलापूर दौऱ्यात पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला व करमाळ्यात बैठक घेतली. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन आमदार उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले.
Sharad Pawar-Eknath Shinde
Sharad Pawar-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on
  1. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी करमाळ्यात बैठक घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.

  2. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार नारायण पाटील व मोहोळचे आमदार राजू खरे उपस्थित राहिल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

  3. दोन्ही आमदारांनी विकासकामे आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्कात असल्याचे स्पष्ट केले.

Solapur, 23 September : शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सोमवारी (ता. २२ सप्टेंबर) सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी करमाळ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तर अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. या दोन्ही कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दोन आमदार उपस्थित होते, त्यामुळे या दोन्ही आमदारांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी करमाळ्यात शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या आढावा बैठकीला शंभूराजे जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, जिल्हासंपर्कप्रमुख महेश साठे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, माजी उपनरागध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहरप्रमुख उपस्थित होते. त्या बैठकीला करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते.

या बैठकीत योगेश कदम यांनी आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. शिंदे यांच्या आदेशानुसारच आपण सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आलो आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आल्यास विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्याही वाढेल, असे सांगितले.

दरम्यान, आमदार नारायण पाटील यांनी यापूर्वीही मुंबईत एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेतच होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांंनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर नारायण पाटील यांनीही पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मतदारसंघातील विकास कामांच्या अनुषंगाने आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायम संपर्कात आहे, असे स्पष्टीकरण पाटील यांनी शिवसेना बैठकीच्या हजेरीबाबत दिले.

Sharad Pawar-Eknath Shinde
Solapur Flood Update : पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटी पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद; वडकबाळ पुलालगत विजयपूर हायवेवरही पाणी

दुसरीकडे, मोहोळचे आमदार राजू खरे हे तर फक्त नावालाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असल्याचे गेल्या काही महिन्यांतील घडामोडींवरून दिसून येत आहे. कारण मोहोळ मतदारसंघात पावसाने थैमान घातलेले असताना आमदार खरे मतदारसंघाबाहेर होते. त्याचे समर्थन करताना आपण दोन दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत होतो. शिंदेंची भेट घेतली असून त्यांना मतदारसंघातील नुकसानीबाबत माहिती दिल्याचे सांगितले.

राजू खरे यांच्या मागणीनुसार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोहोळला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्या बैठकीला आमदार खरे उपस्थित होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार उपस्थित होते.

Sharad Pawar-Eknath Shinde
Ajit Pawar Solapur Tour : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर; जिल्ह्यातील पूरस्थिती, नुकसानीची पाहणी करणार
  1. प्र: योगेश कदम सोलापूरला का आले होते?
    उ: करमाळ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेणे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे हा उद्देश होता.

  2. प्र: या बैठकीत कोणते राष्ट्रवादी आमदार उपस्थित होते?
    उ: नारायण पाटील आणि राजू खरे हे दोन्ही आमदार उपस्थित होते.

  3. प्र: नारायण पाटील यांनी उपस्थितीचे काय कारण दिले?
    उ: विकासकामांसाठी ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

  4. प्र: राजू खरे यांची उपस्थिती का चर्चेत आहे?
    उ: पुरस्थितीच्या काळात शिंदे यांची भेट घेऊन नुकसानाची माहिती दिल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com