Dilip Sopal News: दिलीप सोपल यांच्या बंगल्यात आदल्या फोडणाऱ्यांना यंदा फटाके मिळणार नाहीत...

Barshi Political : गेल्या वर्षी दिवाळीत घडला होता प्रकार, पाच जणांवर खटला सुरू
Dilip Sopal News
Dilip Sopal NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी (जि. सोलापूर) येथील बंगल्यासमोर गेल्या वर्षी ऐन दिवाळीत काही जणांनी आदल्या (मोठा आवाज करणारी स्फोटके) फोडल्या होत्या. या प्रकरणी दिलीप सोपल यांनी तक्रार दिल्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर आता बार्शी येथील न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत या आरोपींना फटाके फोडतानाही या संशयित आरोपींना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

दिलीप सोपल हे त्यांच्या खास वक्तृत्वशैलीसाठी राज्यभर परिचित आहेत. चिमटे काढणे आणि विनोदी शैलीने ते विरोधकांना सळो की पळो करून सोडतात. बार्शी तालुका हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा आहे. या तालुक्यात पक्षापेक्षा उमेदवारकेंद्रित राजकारण आहे. दिलीप सोपल आणि विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांना या तालुक्याने आलटून पालटून संधी दिली आहे. ते कोणत्या पक्षात आहेत, याला फारसे महत्त्व नसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Sopal News
Supriya Sule : ''सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर...'', सुप्रिया सुळेंकडून पुन्हा एकदा फडणवीस लक्ष्य!

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने या तालुक्यात राजकीय विरोधकांमध्ये खेळीमेळीचे वातावरण अभावानेच आढळते. अत्यंत आक्रमकपणे राजकारण केले जाते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी खट्ट झाले तरी त्याला राजकीय संदर्भ जोडला जातो.

अशा या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या बार्शी शहरात दिवाळी सुरू असताना २३ ऑक्टोबर २०२२ च्या मध्यरात्री सोपल यांच्या बंगल्यात स्फोटके फेकण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. बंगल्यात, बंगल्याच्या समोर, गेटवर आणि गेटच्या आत ही स्फोटके फेकण्यात आली होती.

Dilip Sopal News
Naxal on Medigadda : मेडीगड्डावरून नक्षलवादीही ‘केसीआर’वर साधताहेत निशाणा

बार्शी शहरातच राहणारे पेशा रणझुंजारे, नीलेश मस्के, नागेश मोहिते, महेश पवार, अंबादास रणझुंजारे या संशयित आरोपींनी हे कृत्य केले होते, असे माजी मंत्री सोपल यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार या पाच जणांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बंगल्यात सोपल यांच्यासह त्यांचे बंधू, पुतण्या योगेश सोपल, नातू आर्यन हे एकत्र राहतात.

दिवाळीच्या दरम्यान २३ ऑक्टोबर २०२२ च्या मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान स्फोटांसारखे मोठे आवाज आले. त्यामुळे घाबरून घरातील सर्वजण झोपेतून जागे झाले. पाच जण आदलीसारखी स्फोटके फोडत असल्याचे त्यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यामुळे बंगला, गेटचे नुकसान झाले. एका स्फोटकामुळे आवारातील गवत जळाले. एक स्फोटक झाडाला धडकून पडले होते.

माजी मंत्री सोपल यांनी या घटनेच्या काही दिवसांनंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या पाचही संशयित आरोपींवर पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्यांचा खटला आता न्यायालयात सुरू आहे, असे माजी मंत्री सोपल यांचे निकटवर्तीय, बार्शीचे माजी नगराध्यक्ष नागेश अक्कलकोटे यांनी सांगितले. त्यामुळे स्फोटके फोडणे तर दूरच राहिले, या संशयित आरोपींना यंदाच्या दिवाळीत फटाकेही फोडता येणार नाहीत. फटाके फोडतानाही त्यांना दहा वेळा विचार करावा लागेल.

Edited by Ganesh Thombare

Dilip Sopal News
Manoj Jarange Hunger Strike : ...अन् व्यापारी, राजकीय नेत्यांचा जीव पडला भांड्यात; दिवाळी होणार गोड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com