Eknath Shinde big decision : वसई, विरार, डहाणुकरांसाठी गुड न्यूज ; मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Naigaon- NPT Metro Extended to Virar : वसई विरार मधील नागरिकांना दळणवळणाचे आणखी एक साधन उपलब्ध होणार आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Mumbai : वसई, विरार, पालघर डहाणू येथील नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. येथील नागरिकांना नवी मुंबई, उरणला जाण्यासाठी आता तीन गाड्या बदलाव्या लागणार नाहीत, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या मार्गावरील मेट्रोबाबत मोठा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा मेट्रो मार्ग विरारपर्यंत नेण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता वसई विरार मधील नागरिकांना दळणवळणाचे आणखी एक साधन उपलब्ध होणार आहे.

Eknath Shinde
Praful Patel advice to Rohit Pawar प्रफुल्ल पटेलांचा सल्ला रोहित पवार ऐकणार का ? ; अजितदादांना शुभेच्छा देणार का ?

वसई, विरार पालघर डहाण येथील नागरिकांना नवीमुंबई,उरण याठिकाणी जाण्यासाठी त्यांना सध्या जवळपास तीन गाड्या बदलाव्या लागतात. त्यावर उपाय म्हणून सरकारने मल्टी कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावात रस्ता आणि मेट्रोचा समावेश आहे. हा मार्ग 'जेएनपीटी ते नायगाव' असा होता. काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा मार्ग विरारपर्यंत नेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

Eknath Shinde
Rashtrapati Bhavan : साई संस्थानचे आचारी राष्ट्रपतींसाठी मराठमोळे चविष्ट जेवण बनवणार..

हा कॉरिडॉर जेएनपीटी ते नायगावपर्यंत होता, मात्र आता तो विरारपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी जोडले जाणार आहे. या बैठकीला बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील , आमदार शांताराम मोरे, आमदार रवींद्र फाटक ,माजी महापौर प्रवीण शेट्टी आणि नारायण मानकर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी , नगरविकासचे अधिकारी असीम गुप्ता, गोविंदराज, प्रकल्प संचालक राधेशाम मोपलवार यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com