Shaktipeeth Expressway : निवडणुकीच्या आधी नेत्यांनी छाती फुगवली, मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' भूमिकेनंतर शेतकरी विरोध करणार का?

Shaktipeeth Expressway Controversy : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध म्हणून त्यांच्या समर्थनाची भूमिका विधानसभेतील उमेदवारांनी सरकारच्या विरोधात छाती फुगवली. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आपण जनतेच्या बाजूने असल्याचे छाती ठोकपणे सांगितले.
Shaktipeeth Mahamarg Latest News
Shaktipeeth Mahamarg Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांनी शक्तिपीठ महामार्गाला प्रचाराचा मुद्दा बनवला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध म्हणून त्यांच्या समर्थनाची भूमिका विधानसभेतील उमेदवारांनी सरकारच्या विरोधात छाती फुगवली. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत आपण जनतेच्या बाजूने असल्याचे छाती ठोकपणे सांगितले.

आता निवडणूक झाली निकाल लागला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करणार, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीतील आमदारांची भूमिका काय असणार? महामार्ग पूर्ण होणार का? हे पाहावे लागणार आहे.

बांध्यातील पात्रादेवी ते वर्धा जिल्ह्यातील दिग्रज असा 805 किलोमीटरचा शक्तीपीठ मार्ग प्रस्तावित आहे. राज्यातील तीन महत्त्वाच्या शक्तिपीठांना जोडणारा हा मार्ग महायुती आणि केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जातो. या तीन शक्तीपीठासोबत इतर धार्मिक स्थळांना जोडणारा हा मार्ग बारा जिल्ह्यातून जाणार आहे.

Shaktipeeth Mahamarg Latest News
Parliament Attack 2001 Story : संसदेवरील हल्ल्याचा तो भीषण दिवस! 45 मिनिटे चालला होता थरार...

जवळपास 27 हजार पाचशे एकर जमीन या महामार्गासाठी हस्तगत होणार असून 86 हजार कोटीचा खर्च होणार आहे. मात्र या महामार्गाच्या घोषणेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध होऊ लागला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधातील आमदार देखील या महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्याच्या बाजूने रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांचा रोष पाहता शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्हा पुरता रद्द करण्यात असल्याचा अध्यादेश काढण्यात आला.

तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेच्या तोंडावर हा अध्यादेश जाहीर केला. महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करणार असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका न घेण्याची जाहीर केला असलं तरी कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग करणार असल्याची भूमिका आहे.

Shaktipeeth Mahamarg Latest News
Kolhapur Politics: कोल्हापुरात सीमावाद पेटला! शिवसैनिकांनी कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना अंबाबाई मंदिर परिसरातच अडवलं अन्...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी आणि विधानसभेतील इच्छुकांनी या सर्व गोष्टीला विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील महायुतींच्या आमदारांची भूमिका काय असणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे?

फडणवीस यांच्या घोषणेनंतर एकाही आमदाराने त्याच्या विरोधात जाहीर भूमिका घेतलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेने या भूमिकेला आज ही विरोध केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात सध्या तरी विरोध दर्शवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com