Karad Politic's : उमेदवारी अर्जांवरील आक्षेप ठरले टर्निंग पॅाईंट अन्‌ ‘अहंकाराच्या शड्डू’ने विरोधकांचा घात केला; संयमी बाळासाहेबांनी पुन्हा मैदान मारले

Sahyadri Sugar Factory election Result : शेवटी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची ऐकी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पृथ्वीराजबाबांच्या घरी झालेल्या बैठकीतही विरोधकांमध्ये एकी न झाल्याने विरोधकांमधील फूट वाढत गेली.
Manoj Ghorpade-Dhairysheel Kadam-Balasaheb patil
Manoj Ghorpade-Dhairysheel Kadam-Balasaheb patilSarkarnama
Published on
Updated on

Karad, 08 April : कोणत्याही परिस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळवायचीच, या इर्ष्येने पछाडलेल्या विरोधकांचे मनसुबे माजी सहकार मंत्री तथा विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आपल्या शांत आणि संयमी खेळीने उधळून लावले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची चिंता करत बसण्यापेक्षा बाळासाहेबांनी दुसऱ्याच दिवसांपासून ‘सह्याद्री’साठी पायाला भिंगरी बांधून कारखान्याचे संपूर्ण कार्यक्षेत्राचा दौरा केला. (स्व.) पी. डी. पाटील यांचे काम, बाळासाहेबांचा जनसंपर्क आणि कारखाना पुरस्कृत पाणी योजना या गोष्टी सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनेलच्या जमेच्या बाजू ठरल्या.

सह्याद्री ताब्यात घेण्यास निघालेल्या विरोधकांना त्यांच्याच अहंकाराच्या शड्डूने गारद केले. उमेदवारी अर्जावर घेतलेले आक्षेप हे टर्निंग पॉईंट ठरले आणि विरोधकांत फूट पडली. तेथूनच सह्याद्रीच्या निवडणुकीला कलाटणी मिळाली. विरोधकांमध्ये फूट पडली नसती तरी बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली असती, हे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Sahyadri Sugar Factory Election) मोठ्या चुरशीने झाली. सुमारे ८१ टक्के मतदान झाल्याने विरोधकांना परिवर्तनाची अपेक्षा होती. त्यातूनच सर्वपक्षीय पॅनेल उभारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो फिस्कटला आणि विरोधकांची गणिते फसत गेली. सभासदांनी तब्बल सात ते साडेसात हजार मतांच्या फरकानी पी. डी. पाटील यांच्या पॅनेलला निवडून दिले.

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ, काँग्रेसचे निवास थोरात यांनी कोणत्याही परिस्थितीत सह्याद्री कारखान्यात सत्तांतर करायचे, असा पण केला होता, त्यादृष्टीने त्यांनी फिल्डिंग लावली होती. त्यातूनच विरोधकांकडूनही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, दहा जणांच्या उमेदवारी अर्जांसोबत जोडलेल्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दहा जणांचे अर्ज अवैध ठरविले, तिथेच विरोधी गटातील धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आणि निवास थोरात यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तेथूनच विरोधकांनी एकमेकांवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.

पृथ्वीराजबाबांची मध्यस्थीही असफल

बाळासाहेब पाटील यांच्या एकहाती सत्तेला नेस्तनाबूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांमध्येच फूट पडली. एकमेकांवर टीका केल्याने त्यांच्यातील अंतर वाढत गेले. शेवटी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची ऐकी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पृथ्वीराजबाबांच्या घरी झालेल्या बैठकीतही विरोधकांमध्ये एकी न झाल्याने विरोधकांमधील फूट वाढत गेली.

Manoj Ghorpade-Dhairysheel Kadam-Balasaheb patil
Babasaheb Manohare : आयुक्त बाबासाहेब मनोहरे प्रकरणात मोठी अपडेट; ‘गोळी झाडून घेण्यापूर्वी आयुक्तांना फोन आला होता’

भाजपच्या प्रमुख नेत्यांची तोंडे दोन दिशेने

भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, पक्षाचे कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ आणि कॉँग्रेसचे निवास थोरात यांनी सहकाऱ्यांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम हे चार महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या आपल्याच पक्षाच्या आमदारावर तोंडसुख घेऊ लागले. आमदार मनोज घोरपडे यांनीही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे फुल्ल ताकदीने सत्ताधारी बाळासाहेब पाटलांच्या पॅनेलच्या विरोधात लढण्याऐवजी विरोधक आपापसांतच भिडत गेले, तीच विरोधकांमध्ये अंहकरामधून पडलेली फूटच कारणीभूत ठरली आहे. विरोधकामधील अहंकाराने त्यांचा घात केला, हे सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणूक निकालावरून दिसून येते.

विधानसभेतील पराभवाने पाटील झाले सावध

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे सावध झालेल्या बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने होणारी कोंडी लक्षात घेऊन कार्यक्षेत्रात जबरदस्त संपर्क वाढवला. गावोगावी आपल्या गटाची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विरोधक हे विधानसभा निवडणुकीतील विजयात गाफील होते. बाळासाहेबांनी विधानसभेतील चूक सुधारून जनसंपर्क वाढविला आणि विरोधकांना सह्याद्रीच्या निवडणुकीत चारीमुंड्या चित केले.

शांत संयमी बाळासाहेबांचे डाव ठरले वरचढ

सह्याद्री साखर कारखान्यावर असणारे कर्ज, कारखान्याची मालमत्ता, उसाला देण्यात येणारा बाजारभाव हे सर्व सभासदांसमोर मांडले. विरोधकांंकडून होणाऱ्या टीकेला बाळासाहेब पाटील यांनी कधीही पातळी सोडून उत्तर दिले नाही. मात्र आपल्या शैलीत शेलक्या शब्दांत समाचार घेतला. बाळासाहेब पाटील यांनी स्वभावाप्रमाणे शांत, संयमीपणे टाकलेले डाव यशस्वी होत गेले आणि विरोधकांना पराभवाची धूळ चारली.

Manoj Ghorpade-Dhairysheel Kadam-Balasaheb patil
Sahyadri Sugar Factory Result : ‘सह्याद्री’तील पराभवानंतर रोहिणी खडसेंनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले; ‘बॅलेट निवडणुकीत अर्धी मतेही भाजप पॅनेलला मिळाली नाहीत’

लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला

साताऱ्याची खासदारकी गेल्यावेळी श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून कराडला होती. मात्र, या वेळी ती साताऱ्याला गेली. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका ताजा असतानाच कऱ्हाड उत्तरमधून विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. खासदारकीपाठोपाठ कऱ्हाडमधून आमदारकीही गेली, याची सल कऱ्हाडच्या जनतेला होती. त्यातूनच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता कराडकरांच्याच हाती राहावी, यासाठी सर्वजण एकत्र आले हेाते. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला भरभरून मतांनी निवडून दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com