Udayanraje Bhosale News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात् ईपीएफ कार्यालय कोल्हापूर येथे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील वर्गणीदारांची गैरसोय होत आहे. त्यासाठी हे कार्यालय सातारा येथे मंजूर करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार तथा पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. यादव यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला.
सातारा जिल्ह्यात ईपीएफची वर्गणी भरणाऱ्या 3 हजार 200 संस्था असून, ईपीएफमध्ये दरमहा सुमारे 1.25 कोटी रुपयांचा भरणा केला जातो. कर्मचाऱ्यांना छोट्या-छोट्या कामांसाठी कोल्हापूरला Kolhapur जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी साताऱ्यात ईपीएफ कार्यालय मंजूर व्हावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी केली.
तसेच 100 खाटांचे ईएसआय रुग्णालय मंजूर केल्याबद्दल यादव यांना धन्यवाद देण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली. जागेच्या हस्तांतरणाचा विषय राज्य स्तरावर प्रक्रियेत असून, हस्तांतरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सातारा आणि सांगली जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांचा मुद्दाही खासदार उदयनराजे यांनी या भेटीदरम्यान उपस्थित केला. येथील ग्रामस्थांना वन्यजीवांचा धोका असून, काही गावांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली.
याप्रश्नी मंत्रालय स्तरावर तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना मंत्री यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मी स्वतः सातारा जिल्ह्याला भेट देणार असून, त्यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
(Edited By : Umesh Bambare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.