BJP Politics : राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी अयोग्य! जोडे मारून...

Rahul Gandhi : भाजप कार्यकर्त्यांचे निदर्शन, बॅनर्जी नक्कल करत असताना राहुल गांधी यांनी व्हिडिओ काढल्याच्या निषेध
BJP Andolan
BJP Andolansarkarnama

BJP Vs Congress : सुरक्षा व्यवस्थेवरून सरकारने निवेदन द्यावे, या मागणीसाठी आग्रही राहणाऱ्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि एका खासदाराने धगखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनर्जी नक्कल करत असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्याचा व्हिडिओ काढला. याच्या निषेधार्थ नाशिक शहरात भाजपनें आंदोलन केले. राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी अयोग्य नेते आहेत, असा तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

संवैधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांचा निषेध करून भाजपा कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा येथे राहुल गांधीच्या पुतळयाला जोडे मारून तीव्र निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप (BJP) आणि पंतप्रधानांच्या समर्थनासाठी तर राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केले.

BJP Andolan
Dhananjay Mahadik: पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा; धनंजय महाडिकांची राज्यसभेत मोठी मागणी

राहुल गांधी हे स्वतःला भावी पंतप्रधान समजतात. विरोधी पक्षांकडून त्यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले जाते. त्यांनी अशोभनीय वर्तन करणाऱ्यांना रोखले पाहिजे होते. मात्र, त्यांनी त्याचा व्हिडिओ काढत आनंद घेतला. हे अयोग्य वर्तन असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केला.

भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या पायऱ्यावर तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करुन अवमान केला. याप्रसंगी निलंबित केलेले उपस्थित खासदार या नकलेवर हसून दाद देत होते. याचा निषेध करण्याऐवजी काँग्रेसचे नेते गांधी यांनी या सर्व प्रकाराची आपल्या स्वत:च्या भ्रमणध्वनीमध्ये चित्रफित काढली, याला काय म्हणावे, असा प्रश्न देखील जाधव यांनी केला.

यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, काशिनाथ शिलेदार, सुनील केदार, ॲड. शाम बडोदे, वसंत उशीर, अमित घुगे, अनिल भालेराव, सुजाता करजगीकर, पवन भगुरकर, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर काकड, महेश हिरे, उत्तम उगले, ॲड. मिनल भोसले, राजेंद्र महाले, हेमंत शुक्ल, सोनाली ठाकरे, सागर शेलार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

BJP Andolan
Satara BJP News : तृणमूल खासदाराचा भाजपने केला निषेध; कायमच्या बडतर्फीची केली मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com