Wai Political News : या कारणांसाठी मकरंद पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नाही...

Makrand Patil किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या विधिमंडळाची 52 वी वार्षिक सभा मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Ajit Pawar, Makrand Patil
Ajit Pawar, Makrand Patilsarkarnama
Published on
Updated on

-विलास साळुंखे

Wai Political News : आमचे कुटुंब शरद पवारसाहेबांना मानणारे असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत काम करीत होतो. परंतू अजितदादांनी फारकत घेवून मलाही नऊ जणांबरोबर कॅबिनेट मंत्र्यांची शपथ देत होते. मात्र, खंडाळा कारखाना व किसन वीर कारखान्याला जोपर्यंत मदत होत नाही, तोपर्यंत मी शपथ घेणार नाही असे दादांना सांगितल्याचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आज स्पष्ट केले.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या Kisan Vir Sugar Factory विधिमंडळाची 52 वी वार्षिक सभा आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, संचालक शशिकांत पिसाळ, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव पवार, उपस्थित होते.

मकरंद पाटील म्हणाले, किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या निवडणुका कार्यकत्यांच्या आग्रहाखातर लढविल्या मात्र, त्या जर लढविल्या नसत्या तर आज दोन्ही कारखाने लिलावात गेले असते. किसन वीरला पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असताना उपलब्ध ऊस, एक लाख लिटरची डिस्टीलरी तसेच प्रचंड आर्थिक सुबत्ता असताना कारखाना बंद पडण्याची वेळ मागील व्यवस्थापनाने आणली आहे.

गेल्या चार पाच हंगामात शेतक-यांना उसाचे बिल मिळाले नाही, कामगाराचे पगार मिळाले नाहीत, व्यापार्ऱ्यांची 90 कोटींची देणी राहिली आहेत. त्यामळे कारखान्यावर एक हजार कोटीचे कर्ज झाले आहे. किसन वीर कारखान्याचे सध्या ऑडीट सुरु आहे. त्यामध्ये मागील काळात प्रचंड भ्रष्ट्राचार झाल्याचे उघड होत आहे. कारखान्याचा पत्रासुध्दा संचालकांनी पळविला आहे.

आता थकहमीच्या माध्यमातून निश्चितपणे मदत मिळणार आहे. त्यासाठी संचालकांच्या प्रॉपटी गहाण ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही कारखाने चांगल्या सुस्थितीत येण्यासाठी चांगला मार्ग काढू. या वर्षाच्या हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज केली असून तोडणीसाठी सुमारे 17 कोटी 60 रुपये पोहाोच केले आहेत. या कारखान्यासाठी भागभांडवल जमा करण्याचे काम सुरु आहे. हा कारखाना स्थितीत आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

आमचे कुटुंब पवारसाहेबांना मानणारे असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत काम करीत होतो. परंतू अजितदादांनी फारकत घेवून मलाही नऊ जणांबरोबर कॅबिनेट मंत्र्यांची शपथ देत होते. मात्र, खंडाळा कारखाना व किसन वीर कारखान्याला जोपर्यंत मदत होत नाही, तोपर्यंत मी शपथ घेणार नाही असे सांगतले आहे.

Ajit Pawar, Makrand Patil
Wai Police News : आयपीएस कमलेश मीना यांचा वाईत व्यसनमुक्तीचा अनोखा पॅटर्न

तरीही दोन्ही कारखाने डोळ्यासमोर ठेवून शासनाने थकहमीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रलंबित ठेवला होता, असेही त्यांनी नमुद केले. दरम्यान, मागील व्यवस्थापनातील संचालक नंदकुमार निकम यांनी किसन वीर कारखान्यावरील पत्रा स्वतःच्या फायदयासाठी नेला आहे. त्याची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

Edited By Umesh Bambare

Ajit Pawar, Makrand Patil
Pankaja Munde On Mumbai : पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर मिळत नव्हतं, असा झाला त्रास...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com