Wai Police News : आयपीएस कमलेश मीना यांचा वाईत व्यसनमुक्तीचा अनोखा पॅटर्न

Kamlesh Meena व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशांचा शोध घेऊन त्यांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती करण्याची संकल्पना श्री. मीना यांनी मांडली.
IPS Kamlesh Meena with Wai Youth
IPS Kamlesh Meena with Wai Youthsarkarnama
Published on
Updated on

-भद्रेश भाटे

Wai IPS Officer News : समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी आणि तरुणांमधील व्यसनाधीन कमी करण्यासाठी वाईचे प्रभारी आय.पी. एस.अधिकारी कमलेश मीना यांनी पुढाकार घेऊन वाईमध्ये व्यसनमुक्तीचा अनोखा उपक्रम राबविला आहे. या परिसरातील झोपडपट्टीतील तरुणांना व्यसनापासून परावृत्त करून त्यांना स्वत: च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वाई येथील Wai पोलीस ठाण्याचा कार्यभार आय.पी.एस IPS अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी तीन महिन्यांसाठी स्वीकारला आहे. याकाळात शहरात गस्त घालत असताना झोपडपट्टीमधील तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठ्याप्रमाणात असून गुन्हेगारी वाढण्याचे प्रमुख कारण तरुणामधील व्यसनाधीनता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांचे मार्गदर्शनाखाली व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशाचा शोध घेऊन त्यांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती करण्याची संकल्पना मांडली.

सदर योजना त्यांनी दिशा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन कदम यांना सांगितली. त्यावर डॉ. कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांमार्फत व्यसन मुक्ती केंद्रात भरती केलेल्या युवकांचे उपचार मोफत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, हवालदार भोईर, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के,श्री.शिंदे, श्री.कदम यांनी व्यसनाधिनतेकडे वळलेल्या युवकांचा झोपडपट्टी परिसरामध्ये शोध घेतला.

तसेच आपले सर्व उपचार वाईतील दिशा व्यसन मुक्ती केंद्रात मोफत केले जातील, असे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अश्वासित केले. त्यानुसार समीर पटवेकर, फराज दारुवाले, गणेश लाखे (सर्व रा.रविवार पेठ), जय घाडगे व अक्षय घाडगे (दोन्ही रा.लाखानगर झोपडपट्टी),निखील कुदळे (रा.फुलेनगर) आणि महेश बुलुंगे (रा.रामडोह आळी) या सात युवकांना ४ ऑगस्ट २०२३ रोजी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती केले.

त्यांचा राहणेचा,जेवणाचा तसेच त्यांचे उपचाराचा सर्व खर्च दिशा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक प्रा. डॉ. कदम यांनी उचलला.या युवकांमध्ये चांगला बदल होत असल्याचे प्रा.कदम यांनी सांगितल्यानंतर कमलेश मीना यांना केंद्राला भेट देऊन उपचार घेत असलेल्या युवकांची विचारपुस केली. त्यावेळी त्यांना व्यसनाधिन युवकांनामध्ये मोठया प्रमाणात बदल झाल्याचे दिसले.

IPS Kamlesh Meena with Wai Youth
Satara Political News : शंभूराज देसाई म्हणाले, आमचे आमदार दोषी नाहीत; बाजू मांडण्यास पुरेशी संधी द्यावी...

या युवकांमध्ये कलाकार दडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामधील समीर पटवेकर याने सुंदर असे छोटे मोठे आकाश कंदील, मेडिकल दुकानात औषधे देण्यासाठी लागणारी कागदी पाकीट, गणेशोत्सवासाठी फुलांच्या तोरण माळा बनविल्या. त्याला सर्व तरुणांनी मदत केली. तसेच निखील कुदळे याने भगवत गीतेमधील काही ओव्यांचे मराठीत भाषांतर केले होते.

हे सर्व पाहुन कमलेश मीना भारावुन गेले. त्यांनी सर्वांचे कौतुक करुन यापुढे व्यसनाधीनतेकडे न वळता आपल्यातील कलागुणांना असाच वाव देवुन आपली समाजातील प्रतिमा उंचावणेबाबत मार्गदर्शन केले. याकामी सहकार्य करणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक प्रा. डॉ कदम, मानसोपचार तज्ञ डॉ. तेजस पिंगळे (पुणे), व्यवस्थापक निलेश कदम, समन्वयक निहारीका चावरे यांना धन्यवाद दिले.

Edited By Umesh Bambare

IPS Kamlesh Meena with Wai Youth
Mumbai Senate Elections: सिनेट निवडणूक स्थगित का केली ? उच्च न्यायालयाचा सवाल; ३ ऑक्टोबरला होणार फैसला ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com