

Solapur, 03 November : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी परिसरात घडली.
दरम्यान, प्रतापसिंह करचे यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पत्नीने शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील नेते तथा सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक तानाजी पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पाटील कुटुंबीयांनी सुपारी देऊन हा खून केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रतापसिंह करचे हे स्वतःच्या चारचाकी गाडीतून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत असलेले संशयित आरोपी हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे यांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे. त्यामुळे सांगोल्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सांगोला पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
प्रतापसिंह करचे यांच्या खुनामागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप मृत करचे यांच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. आटपाडी येथील शिवसेनेचे नेते तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी कट रचून सुपारी देऊन हा खून घडवून आणला आहे, अशी तक्रार करचे कुटुंबीयांनी सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे दिली आहे.
राज्यात भाजपचे सरकार असतानाही भाजप कार्यकर्त्याचा अशा प्रकारे खून होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा, अशी मागणी अर्चना करचे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.