Congress Leader rejected KCR offer : ‘अण्णा, माफ करा. तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही’ : सोलापूरच्या नेत्याने नाकारली ‘KCR’ची ऑफर

केसीआर यांना नकार देणारे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते आहेत.
K. Chandrasekhar Rao- Dharmanna Sadul
K. Chandrasekhar Rao- Dharmanna Sadul Sarkarnama

सोलापूर : काँग्रेसचे (Congress) माजी खासदार धर्माण्णा सादूल (Dharmanna Sadul) यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती.

मात्र, सादूल यांनी केसीआर यांची ती ऑफर नाकारून काँग्रेस पक्षातच काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. केसीआर यांना नकार देणारे सादूल हे महाराष्ट्रातील राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यानंतरचे दुसरे नेते आहेत. (Former Congress MP from Solapur Dharmanna Sadul rejected the offer of 'KCR')

केसीआर यांच्या ऑफरबाबत सादूल म्हणाले की, सुमारे सव्वा महिन्यापूर्वी तेलगंणाचे मंत्री आणि माझे मित्र चंद्रकांत रेड्डी यांचा मला फोन आला होता. त्या वेळी त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केसीआर बोलणार असल्याचे सांगितले होते.

थोड्या वेळाने केसीआर यांना फोन आला त्यांनी विचारले की तुम्ही कोणत्या पक्षात काम करता. मी त्यांना सांगितलं की मी पूर्वीपासून काँग्रेस पक्षात होतो आणि आजही काँग्रेस पक्षाचेच काम करतो. त्यावर ते म्हणाले की, काँग्रेस पक्षात आता काही राहिलेले नाही.

माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही माझ्याबरोबर या. आपण मिळून एकत्र काम करू. मी राष्ट्रीय पातळीवर माझा पक्ष वाढवतोय, त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर यावे, अशी माझी इच्छा आहे.

K. Chandrasekhar Rao- Dharmanna Sadul
CM On Koshyari : मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्राला कोश्यारींची ओळख ‘या’ कारणांमुळे कायम राहील’

मी त्यांना सांगितलं की, अण्णा मला फार करा. मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. मला काँग्रेस पक्ष सोडणं शक्य नाही, मला माफ करा, असे उत्तर मी चंद्रशेखर राव यांना दिलं. मी आतापर्यंत पक्षाची प्रातारणा केली नाही. मी आतापर्यंत पक्षाचा आदेश मानत काम करत आलो आहे. माझ्यासाठी पक्षनिष्ठा महत्वाची आहे.

K. Chandrasekhar Rao- Dharmanna Sadul
Solapur University : अहिल्यादेवी स्मारक समिती सरकारने बदलली; भाजप-शिंदे समर्थकांना संधी

के. चंद्रशेखर राव यांनी आता राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीऐवजी भारत राष्ट्र समिती असे केले आहे. आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी शेजारच्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी नांदेडमध्ये मेळावाही घेतला आहे.

त्यात त्यांनी ‘अगली बार-शेतकरी सरकार’ अशी घोषणा केली हेाती. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची, तसेच राज्यात पक्षाची धुरा सांभाळण्याची विनंती केली हेाती. मात्र, त्यांनी ते विनंती फेटाळली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com