Narasayya Aadam : भाजपच्या महालाटेत आडम मास्तरांचीही नौका बुडाली; मुलगी अन्‌ नातसुनेचा पराभव

Solapur Corporation Election 2026 : भाजपच्या जोरदार लाटेत सोलापूर महापालिका निवडणुकीत सीपीआयएमलाही मोठा धक्का बसला. नरसय्या आडम यांच्या मुलगी व नातसुनेचा पराभव झाल्याने लाल बावट्याची वाताहत स्पष्ट झाली आहे.
Narsayya Adam
Narsayya AdamSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 January : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्व राज्यातील मोजक्याच मतदारसंघात दिसून येते. यात सोलापूरमध्ये माजी आमदार नरसय्या आडम यांंचा समावेश असून पक्षबदलाच्या राजकीय दलदलीत अनेकदा ऑफर येऊनही आडम यांनी आपली निष्ठा लाल बावट्यावर कायम ठेवली. मात्र, सोलापूर महापालिका निवडणुकीत आडम मास्तर यांची मुलगी अन्‌ नातसुनेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे सोलापुरात भाजपच्या वावटळीत लाल बावट्याचीही वाताहात झाल्याचे दिसून येते.

सोलापूर (Solapur) महापालिकेच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीतून निवडणूक लढवली होती. आघाडीत माकपला सहा जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यातील दोन जागांवर आडम मास्तर यांच्या घरातीलच उमेदवार देण्यात आले होते. मात्र, या दोन्ही उमेदवारांना पराभावाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे मास्तरांचे राजकारण आता पणाला लागल्याचे दिसून येते.

प्रभाग क्रमांक नऊ ‘क’मधून नरसय्या आडम (Narasayya Aadam ) यांची मोठी मुलगी अरुणा गेंट्याल यांना माकपकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत गेंट्याल यांना 3526 एवढी मते मिळाली, त्यांच्या विरोधात भाजपच्या पुजा श्रीकांत वाडेकर यांनी तब्बल 14 हजार 823 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यामुळे अरुणा गेंट्याल-आडम यांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे.

आडम यांच्या मुलाशिवाय त्यांची नातसून अनिता आडम यांनाही प्रभाग क्रमांक १३ ब मधून पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपच्या अंबिका चौगुले यांनी निवडणूक लढवली होती. या लढतीत चौगुले यांना नऊ हजार ३७६ मते मिळाली, तर अनिता आडम यांना ४ हजार १८२ मते मिळाली. या लढतीत आडम यांना पराभव पत्कारावा लागला.

Narsayya Adam
MIM Politic's : ‘एमआयएम’मध्ये नवा ट्विस्ट; ओवेसी अन्‌ नव्या नगरसेवकांच्या मनातही फारूक शाब्दी पुन्हा...!

माकपचे युवा पदाधिकारी अनिल वासम यांच्या पत्नी गीता वासम यांनीही प्रभाग क्रमांक नऊमधून, तर प्रभाग क्रमांक १३ मधून पक्षाचे नेते कुर्मय्या म्हेत्रे यांचे नातू श्रीनिवास म्हेत्रे, सुषमा सरवदे यांनी, तर माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांनी प्रभाग १८, तर प्रभाग १६ मधून विनिता मनचले यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Narsayya Adam
Solapur Mahapalika : आजोबा, काकानंतर नातू ठरणार सोलापूरचा नवा कारभारी; महापालिकेची सूत्रे पुन्हा ‘राधाश्री’तूनच हलणार

‘माकप’च्या निष्ठावंतांना महापालिका निवडणुकीत जनतेने नाकारल्यामुळे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि माकपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण विधानसभा निवडणुकीत खुद्द मास्तरांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे माकपपुढे आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com