
Sangli News : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. सध्या या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. तर बीडमधील ‘वाल्मिक कराड स्टाईल’ मोडीत काढण्याची मागणी जिल्ह्यातील नागरीक करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यात ‘वाल्मिक कराड स्टाईल’ने पाय टाकले आहेत. येथे एका माजी उपमहापौराने ‘निविदा मॅनेज’च्या वादातून ठेकेदाराच्या मुलाला मारहाण व धक्काबुक्की केली आहे. यामुळे सध्या सांगलीत वातावरण तंग असून पालिका वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पण आता याच मलईवरून महापालिकेतील ‘निविदा मॅनेज’ करण्याचा प्रकार सांगलीत सुरू झाला आहे. तर याचा वाद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी साकाळी रस्त्यावर आला आहे. ‘निविदा वॉर’मधून माजी उपमहापौर-आणि ठेकेदार याच्या पूत्रात मारहाण व धक्काबुक्की झाली आहे. मात्र याची नोंद पोलिस दप्तरी नोंद झालेली नाही.
अलीकडेच ‘निविदा वॉर’आणि महापालिकेत खालच्या पातळीवर भ्रष्टाचार कमी झाला असला तरी तो वरच्या पातळीवर अधिक असल्याची चर्चा सुरू आहे. यावरूनच सत्ताधारी भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या आवारात अनेकांवर हात टाकले आहेत.
या भ्रष्टाचारावरून खासदार विशाल पाटील यांनी देखील टीका केली होती. मध्यंतरी याची चर्चा कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा थेट एका माजी उपमहापौरानेच ठेकेदाराच्या मुलावर हात टाकल्याने शहरात चर्चांना रंग चढला आहे.
सध्या बीडमध्ये वाल्मिक कराडची जोरात चर्चा असून येथे अनेक गैर व्यवहार याच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे उघड होत आहे. आता सांगली, मिरजमध्ये देखील काही मंडळी वाल्मिक स्टाईलने काम करू पाहत आहेत. पण भाजप नेत्यांची ही स्टाईल पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या नजरेतून कशी सुटतेय असा सवाल आता सांगलीत उपस्थित केला जातोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.