Walmik Karad ED enquiry : हायकोर्टाकडून वाल्मिक कराडला मोठा दिलासा; याचिकाकर्त्यालाच ठोठावला दंड...

Santosh Deshmukh Murder Case Mumbai High Court PIL Update : आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
Walmik Karad
Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला मुंबई हायकोर्टाने आज मोठा दिलासा दिला. कराड यांची ईडी चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. एवढेच नाही तर कोर्टाने याचिकाकर्त्यालाच 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेमागचा याचिकाकर्त्यांचा हेतू स्पष्ट होत नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे कोर्टाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या देखरेखीखाली करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती. पण कोर्टाने याचिका फेटाळल्याने कराडला दिलासा मिळाला आहे.

Walmik Karad
NCP MLA : हत्तीवरून 125 किलो पेढे वाटणं दादाच्या आमदाराला पडलं महागात, थेट दाखल झाला गुन्हा

कराडला सुरूवातीला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशमुख हत्या प्रकरणातही त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. सध्या या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत केली जात आहे. मात्र, या तपासाला मर्यादा असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह अंजली दमानिया यांनीही कराडच्या बेनामी संपत्तीविषयी अनेक गंभीर दावे केले आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी प्लॅड, बीडमध्ये गावांमध्ये जमीन अशी संपत्ती त्यांनी जमवल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे यामध्ये ईडीची एन्ट्री होणार, अशीही चर्चा रंगली होती.

Walmik Karad
Latur Crime : न्यायालयाचा शिंदेंच्या मराठवाड्यातील शिवसेना नेत्याला मोठा झटका; अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी 10 वर्षांचा कारावास

दरम्यान, कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे दमानिया यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही मुंडेंवर सातत्याने टीका केली जात आहे. दमानिया यांनी मुंडेंवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याला मुंडेंनीही प्रत्युत्तर देत बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com