Kolhapur News : धक्कादायक : पन्हाळ्यात गव्याच्या हल्ल्यात माजी उपसरपंचांचा मृत्यू

हल्ल्यानंतर गवा त्याच शेतात थांबून होता. पळापळीने दमछाक झालेला गवा सुमारे तीन तास शेतातच बसून होता.
Manik Patil
Manik PatilSarkarnama
Published on
Updated on

पुनाळ (जि. कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील माजी उपसरपंचांचा गव्याच्या हल्ल्यात आज मृत्यू झाला. माणिक बळवंत पाटील (वय ४८) असे त्यांचे नाव असून त्यांच्या छातीत गव्याचे शिंग घुसले होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. (Former deputy sarpanch dies in Gaur attack in Panhala)

दरम्यान, हल्ल्यानंतर गवा त्याच शेतात थांबून होता. पळापळीने दमछाक झालेला गवा सुमारे तीन तास शेतातच बसून होता. सायंकाळी वन विभागाने रेस्क्यू फोर्सच्या मदतीने गव्याला डोंगरात हुसकावून लावले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.

Manik Patil
Khed Panchayat Samiti : आढळरावांनी अखेर करून दाखवलं : खेड पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन

गेले दोन दिवस परिसरात गव्याचे दर्शन होत आहे. वाघजाई डोंगर परिसरात नेहमीच गवा पहावयास मिळतो. दोन दिवस वाघजाई डोंगर, पडळ, माजगाव येथील डोंगर व शेतातून गवा पहावयास मिळत आहे. हा गवा आज दुपारी कसबा ठाणे गावच्या हद्दीत आला होता. हरिजन वसाहतीच्या स्मशानभूमीजवळील शेतात गवा होता.

रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास माणिक पाटील त्यांच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते. वैरण कापत असताना बिथरलेला गवा अचानक समोर आला आणि त्याने माणिक पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या छातीत गव्याने शिंग खुपसले. आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांना सीपीआर येथे हलवले; पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Manik Patil
Chitra Wagh News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा लागला, याचे दुःख आहेच : चित्रा वाघांनी दिली कबुली

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. दरम्यान, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सीपीआरमधील डॉक्टरांची, नातेवाईकांची भेट घेतली. वनविभागाला सूचना देऊन आर्थिक मदतीसाठी कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

उतावीळ तरुणाई...

दोन दिवस गवा परिसरात आहे. पूर्ण वाढ झालेल्या गव्याला पाहण्यासाठी व हुसकावून लावण्यासाठी तरुणाई उतावीळ झाली होती. गव्याच्या पाठीमागून पळत जाणे, काठी, दगडाने हुसकावून लावणे, त्याच्या जवळ जाऊन व्हिडिओ काढणे, असे प्रकार सर्रास होते. त्यामुळे गवा बिथरतो व अंगावर चाल करुन येतो. हे प्रकार थांबविणे गरजेचे आहे.

Manik Patil
Pune News : पुण्यात ’डमी आमदारां’चे पेव : ‘विधानसभा सदस्य’ स्टिकर लावून गुंडच फिरतात; आमदारानेच व्यक्त केली खंत

सरकारने पाटील कुटुंबाला मदत द्यावी

गव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आज मृत्यू झालेल्या पाटील यांच्या पाठीमागे दोन मुली आहेत. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. शासनाने त्यांच्या एका मुलीला सेवेत घेऊन कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणी कसबा ठाण्याचे सरपंच अनिष पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com