महादेवराव महाडिक लागले कामाला : जयसिंगपुरात जाऊन घेतली राज्यमंत्री यड्रावकरांची भेट

यड्रावकर यांची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Mahadevrao Mahadik-rajendra patil yadravkar
Mahadevrao Mahadik-rajendra patil yadravkar Sarkarnama

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कोल्हापूर विधान परिषदेसाठी शौमिका महाडिक यांचे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांचे सासरे तथा माजी आमदार महादेवराव महाडिक सक्रीय झाले आहेत. त्यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी आज (ता. १२ नोव्हेंबर) जयसिंगपूरमध्ये जाऊन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली. महाडीक स्वतःच मैदानात उतरल्याने त्यांच्या गटाची यंत्रणाही कामाला लागली आहे. (Former MLA Mahadevrao Mahadik meet to Minister of State Rajendra Patil Yadravkar)

Mahadevrao Mahadik-rajendra patil yadravkar
गावोगावी लागले धनंजय महाडिक यांच्या आभाराचे फलक!

जयसिंगपूर नगरपालिकेत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे स्वीकृत्तसह एकूण १८ नगरसेवक आहेत. या नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक आहेत, त्यामुळे यड्रावकर यांची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महाडीक यांनी नेहमीप्रमाणे आज (शुक्रवारी) सायंकाळी चारनंतर कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यात न येता थेट जयसिंगपूर गाठून राज्यमंत्री यड्रावकर यांची भेट घेतली.

Mahadevrao Mahadik-rajendra patil yadravkar
सतेज पाटलांना एकतर्फी वाटणारी निवडणूक झाली रंगतदार : महाडिकांच्या घरातीलच उमेदवार!

कोल्हापूर विधान परिषदेच्या या निवडणुकीत महादेवराव महाडीक यांच्या स्नूषा सौ. शौमिका याच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी स्वतः माजी आमदार महाडीक हेच मैदानात उतरले आहेत. तत्पूर्वी माजी खासदार धनंजय महाडीक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने जयसिंगपूर आणि शिरोळ येथील नगरसेवकांची भेट घेतली आहे. शौमिका महाडिक यांच्या नावाची भाजपकडून उद्या (ता. १३ नोव्हेंबर) घोषणा झाल्यानंतर ही यंत्रणा अधिक सक्रिय होणार आहे, हे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com