
Sindhudurg News : कोकणात सध्या ऑपरेशन टायगर आणि पुन्हा एकदा ऑपरेशन शिवधनुष्य केले जात आहे. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याचे मनसुबे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हे शिवधनुष्य घेतलं आहे. यातच माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नीला एसबीने चौकशीला बोलावले आहे. यामुळे ते शांत होतील, ठाकरे गटाला सोडतील अशा चर्चा रंगल्या असतानाच नाईक यांनी आपण गप्प बसणाऱ्यामधले नसल्याचे दाखवून दिले आहे. वैभव नाईकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, वीज ग्राहकांनी सरकारचे स्मार्ट प्रीपेड वीज मीटरच बंद पाडले आहे. यामुळे जिल्ह्यात वैभव नाईक पुन्हा ॲक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत.
वैभव नाईकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, वीज ग्राहकांनी जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटरविरोधात मोर्चा काढला. कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्यास जिल्ह्यात उद्रेक होईल आणि त्याला वीज वितरण कंपनी जबाबदार असेल, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला. या इशाऱ्यानंतर कुडाळ व कणकवली विभागांतर्गत सुरू असलेले मीटर बसविण्याचे काम स्थगित करणारे पत्र महावितरण सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाने खासगी कंपनीस दिले आहे.
कुडाळमध्ये वैभव नाईकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, वीज ग्राहकांनी खासगी कंपनीविरोधात घोषणाबाजी करत धडक मोर्चा काढला. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच, राज्य सरकार खासगी उद्योग समूहासोबत करार करून नवी मीटर नागरींकाच्या माथी मारत आहे. यासाठी खासगी कंपनीची नियुक्त करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सध्या शासकीय कार्यलयांना लक्ष करण्यात आले आहे. याकामासाठी राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना फक्त अदाणीसमुहाला फायदा देण्यासाठी असा करार करण्यात आला आहे.
सरकार महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदाणीच्या घशात घालण्याचे काम करतय. यात नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे, या संपूर्ण प्रक्रियेलाच आमचा तीव्र विरोध असल्याचे वैभव नाईकांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर घरगुती ग्राहकांना बसविले जाणार नाही, असे अधिवेशनात जाहीर केले होते. पण आता स्मार्ट आणि प्रीपेड मीटर नवीन कनेक्शन आणि नादुरुस्त मीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर सर्वसामान्यांच्या माथी मारली जातायत. याला जनतेचा तीव्र विरोध आहे.
महायुतीने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याने साडेसात अश्वशक्तीपर्यंत शेतीपंपांना संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. जी कागदावरच आहे. सध्या साडेसात हॉर्स पॉवरच्या वीज पंपांना विद्युत कनेक्शनऐवजी सोलर सक्ती केली जातेय. डोंगराळ आणि अति पावसाच्या भागात सोलर सक्ती ही शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे. तरी ही सक्ती मागे घेऊन मागेल त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन देण्यात यावी, अशीही मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.
महावितरण आणि राज्य विद्युत मंडळाने स्मार्ट आणि प्रीपेड मीटरबाबत जो करार झाला, त्याची मराठी भाषेत प्रत काढावी. ती जनतेला उपलब्ध करून द्यावी, तालुकास्तरावर शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी जनसुनावणी घ्यावी आणि त्यानंतरच सरकारने निर्णय घ्यावा. अन्यथा सरकारचा डाव हाणून पाडू, असा इशारा वैभव नाईक यांनी यावेळी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.