Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याची भाजपच्या व्यासपीठावर हजेरी? प्रवेशाच्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांचा अजब खुलासा

Chandrakant Patil On Ex MP Sanjay Patil : राज्यात सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. कधीही या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच पक्ष आपली बाजू भक्कम करण्यासाठी स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचताना दिसत आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा नारळ कधी फुटण्याची शक्यता आहे. याबाबत डेड लाईनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील देत निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्ते आणि नेत्यांना कोल्हापूर येथून दिले आहे. यामुळे सर्वच पक्ष आता मैदानात उतरले असून रणनीती आखत आहेत. एकीकडे जिल्हा पातळीवरील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचे काम देखील राजकीय पक्ष करत आहेत. भाजपसह शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रक्षप्रवेश होताना दिसत आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भाजपच्या व्यासपीठावर गेल्याने जिल्ह्यासह राष्ट्रवादीत एकच खळबळ उडालेली आहे.

भाजपने पश्‍चिम महाराष्ट्र संघटन पर्वाचे आयोजन कोल्हापूरमध्ये केले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सांगलीचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतील भाजपचे मंत्री, आमदार, खासदारांसह कार्यकर्ते उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेले माजी खासदार संजय पाटील थेट व्यासपीठावर होते. यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना आता बळ मिळाले आहे.

संजयकाका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दोनवेळा खासदार झाले असून विधानसभेच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर त्यांचा राष्ट्रवादीपासून दुरावा निर्माण झाला होता. तर ते पुन्हा भाजपवासी होतील अशा चर्चा सांगली जिल्ह्यात रंगल्या होत्या.

Ajit Pawar
Chandrakant Patil : भाजपचं महायुतीत मोठा भाऊ ? शासकीय कमिट्यांवर 50 टक्के नियुक्त्या; चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्यांना आदेश

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यक्रमास पाटील यांनी हजेरी लावल्याने चर्चांना बळ मिळाले आहे. तर संजयकाका यांना थेट व्यासपीठावरच मंत्री बावनकुळे यांच्या शेजारी बसवण्यात आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले.

यानंतर संजयकाका यांच्या उपस्थितीवर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी, पाटील हे आम्हा सर्वांचे चांगले मित्र आहेत. कोल्हापुरातील कार्यक्रमाला ते मित्र म्हणूनच आले. त्यामुळे ते व्यासपीठावर बसल्याचे म्हटलं आहे.

Ajit Pawar
Chandrakant Patil News : दिल्लीत भाजपकडून 'आप'चा 'करेक्ट कार्यक्रम'; चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसबाबत सर्वात मोठा दावा

पाटील हे भाजपच्या तिकिटावर 2014 व 2019 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांना तासगांव मतदारसंघातून पक्षाची उमदेवारीही दिली होती. मात्र येथेही यांना यश मिळाले नाही. यानंतर ते पक्षापासून दुरावले गेले होते. तर आता थेट भाजपच्या कार्यक्रमाच व्यासपीठावर ते गेल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहे. त्यांचा भाजप प्रवेशाच्या संकेतांनी सांगली जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com